Headlines

लक्झरी बसने दुचाकीला चिरडले; धडकेनंतर बस जळून खाक:बाळापूर-शेगाव मार्गावरील घटना, तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली




बाळापूर-शेगाव मार्गावर बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण अपघात घडला. इंदूर येथून अकोल्याकडे येणाऱ्या एका खासगी लक्झरी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, धडकेनंतर काही क्षणांतच बसने अचानक पेट घेतला. सुदैवाने, चालक आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे बसमधील प्रवाशांना वेळेत बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली बस जळून खाक झाली. गंभीर जखमी दुचाकीस्वाराला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून बाळापूर पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत. आग लागताच बसमध्ये एकच थरकाप उडाला होता. परंतु, शेजारील शेतात काम करणारे ग्रामस्थ व चालकाने तत्काळ बसचे आपत्कालीन दरवाजे आणि खिडक्यांच्या काचा फोडून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच पोलिस व अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातामुळे बाळापूर-शेगाव मार्गावरील वाहतूक काही तासांसाठी विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने जळालेली बस बाजूला करून रस्ता मोकळा केला. उन्हाळ्याच्या दिवसांत किंवा लांबच्या प्रवासात गाड्यांचे टायर गरम होऊन फुटण्याचे प्रमाण वाढते. खासगी ट्रॅव्हल्स प्रशासनाने गाड्यांमध्ये ‘अग्निशमन सिलिंडर’ सुस्थितीत ठेवणे बंधनकारक आहे. टायर फुटल्याने पडली ठिणगी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्वस्तिक ट्रॅव्हल्सची बस क्रमांक एमपी ०९ पीए ०२७१ बाळापूरपासून ४ किमी अंतरावर असताना हा अपघात घडला. दुचाकीला धडक बसल्यानंतर बसचा पुढील टायर फुटला आणि इंजिनमध्ये स्पार्किंग झाल्याने डिझेल टाकीच्या बाजूने बसने पेट घेतला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *