Headlines

आंदोलनाचा धसका:नियमित वीज पुरवठा करण्याचे आश्वासन, आमदार जानकरांची पदयात्रा अखेर स्थगित




गेली २ महिन्यांपासून माळशिरस तालुक्यात सुरू असलेला अनियमित आणि कमी दाबाचा वीजपुरवठा, तसेच ग्रामीण भागात रात्री ६ ते १० या वेळेत होणाऱ्या भारनियमनाच्या त्रासाविरोधात आमदार उत्तमराव जानकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. वेळापूर ते माळशिरस अशी २० किलोमीटर लांबीची भर उन्हातील पायी पदयात्रा गुरुवार दि. २१ मे रोजी काढण्यात येणार होती. मात्र, आंदोलनाची तीव्रता पाहून महावितरणचे वरिष्ठ अधिकारी धावून आले आणि त्यांनी मागण्यांचे लेखी पत्र दिल्याने ही पदयात्रा तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. आमदार उत्तमराव जानकर यांनी घोषित केल्यानुसार गुरुवारी दि. २१ मे रोजी सकाळी ९ वाजता ते वेळापूर येथील निवासस्थानापासून पदयात्रेला सुरुवात करणार होते. भर उन्हात २० किमी चालत सायंकाळी ४ वाजता ते माळशिरस सर्टिफाईड हायस्कूल पटांगणात पोहोचणार होते. यासाठी पंचायत समितीचे सभापती दत्ता मगर, डॉ. मारुती पाटील, बाळासाहेब धाईंजे, पांडुरंग वाघमोडे, ॲड. अविनाश काले, रिपाईचे तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्यासह तालुक्यातून हजारो शेतकरी आणि नागरिक सकाळीच वेळापुरात येऊन थांबले होते. मात्र, आमदार जानकर निवासस्थानावरून निघण्यापूर्वीच महावितरणचे सोलापूरचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने वेळापुरात येऊन आमदार जानकर यांची आंदोलनामुळे हक्काची वीज गेल्या दोन महिन्यांपासून कमी दाबाच्या आणि अनियमित विजेच्या गर्तेत माळशिरस तालुका अडकला होता. म हावितरणने आधीच उपाययोजना केल्या असत्या तर लोकप्रतिनिधींना आणि हजारो शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात रस्त्यावर उतरण्याची तयारी करावी लागली नसती. आता या लेखी आश्वासनाची प्रत्यक्षात कितपत अंमलबजावणी होते. दि. १९ मे पासून माळशिरस तालुक्यातील सर्व ११ केव्ही शेतीपंप वाहिन्यांवरील वाडीवस्ती येथील घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांना वीजपुरवठा व्हावा, यासाठी ग्राहक संख्येच्या प्रमाणानुसार वीज भार २५ ॲम्पीअर एवढा मर्यादित ठेवून सायंकाळी ६ ते १० या वेळेत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.महावितरण कंपनीच्या प्रचलित नियमाप्रमाणे सर्व शेतीपंप वाहिन्यांना ८ तास सुरळीत थ्रीफेज वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. नादुरुस्त वितरण रोहित्र (डीपी) विहित कालमर्यादेत बदलण्यात यावेत, अशा स्पष्ट सूचना कार्यकारी अभियंता, विभागीय कार्यालययांना देण्यात आल्या आहेत. यांची मनधरणी केली आणि मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र सुपूर्द केले. गेल्या दोन महिन्यांपासून कमी दाबाच्या आणि अनियमित विजेच्या गर्तेत माळशिरस तालुका अडकला होता. याच अत्यंत कठीण परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षा पार पाडल्या. महावितरणने आधीच उपाययोजना केल्या असत्या तर लोकप्रतिनिधींना आणि हजारो शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात रस्त्यावर उतरण्याची तयारी करावी लागली नसती. आता या लेखी आश्वासनाची प्रत्यक्षात कितपत अंमलबजावणी होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष आहे. विधिमंडळातील प्रश्न आणि मोर्च्यानंतर महावितरणला जाग



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *