![]()
रोहित पवार यांनी संजय राऊत यांच्या मार्गावर जाऊ नये. जसे संजय राऊत रोज उठून खोटे बोलतात ती सवय रोहित पवारांनी लागली आहे. राऊतांना गुरू करण्याचे काम रोहित पवारांनी केले आहे, मेलोडी चॉकलेट आणि झुरळ काय हे जनतेला माहिती आहे. झुरळांना कसे चिरडायचे हे देशातील माता-भगिणींना माहिती आहे, रोहित पवारांनी जास्त झुरळ झुरळ करू नये, त्यांचा पक्ष पण झुरळांनी पोखरून टाकला आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जनतेने स्वीकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाची काळजी घेत आहे. तुम्हाला तुमच्या मतदारसंघाची काळजी घेता येत नाही. ज्यांच्या जीवावर अराजकता माजेल असे वाटते त्यांनी हे लक्षात ठेवावे की देश झुरळाच्या पाठिशी उभे राहणार नाही. सपकाळ महाराष्ट्राने नाकारलेले नेते नवनाथ बन म्हणाले की, केरळमध्ये काँग्रेसला विजय मिळाला त्यावेळी ती मत चोरी नव्हती का? असा सवाल बन यांनी हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेवर बोलताना केला आहे. तेलंगणामध्ये मतचोरी आणि फेरफार करतच तुम्ही सरकारमध्ये आलात का? ज्या वेळी काँग्रेसचा विजय होतो तेव्हा सर्व काही चांगले असते का? सपकाळ तुम्ही पक्ष संघटनेकडे लक्ष द्यावे. तुम्ही महाराष्ट्राने नाकारलेले नेते आहात, असा टोला बन यांनी लगावला आहे. काँग्रेसच्या काळात महागाईत वाढ नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही महंगाई मॅन नाही ते कॉमन मॅनचे नेते आहेत. सर्व सामान्य जनतेची काळजी करणे हे त्यांचे काम आहे. काँग्रेसने चीनमध्ये जाऊन बघावे तिथे पेट्रोल डिझेलच्या दरात 25 टक्के वाढ झाली आहे. पाकिस्तानमध्ये 100 टक्के वाढ झाली आहे. राहुल गांधी उदो उदो करणाऱ्या चीनमध्ये पेट्रोलची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 2004 मध्ये 40 रुपये लिटर पेट्रोल होते पण 2014 पर्यंत हा रेट 85 रुपयांच्या वर गेला होता. काँग्रेसचा काळ महागाईचा होता. देवाभाऊ जनतेसाठी काम करतात नवनाथ बन म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंदे भारत ट्रेनने शिर्डीपर्यंतचा प्रवास केला. कारण ते जनतेसाठी काम करत आहेत. काँग्रेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहे. पण ते त्यांचा ताफा कमी करायला तयार नाहीत. सातत्याने उधळपट्टी करण्याचे काम काँग्रेस नेत्यांकडून सुरू आहे. देवाभाऊ हे सामान्य जनतेसारखे ट्रेनने प्रवास करत आहेत.
Source link
रोहित पवारांनी संजय राऊतांना गुरू करू नये:जास्त झुरळ-झुरळ करू नये, त्यांचाच पक्ष झुरळांनी पोखरलाय- नवनाथ बन