Headlines

Shirdi Missile Defence Complex Inauguration; CM Fadnavis Hails Aatmanirbhar Bharat



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पाची प्रचिती आज शिर्डीत पाहायला मिळाली. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिर्डी येथे क्षेपणास्त्र संकुल (Missile Complex) आणि तोफगोळा उ

.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशाच्या संरक्षण क्षेत्राला स्वावलंबी बनवण्याची मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. पूर्वी आपण शस्त्रास्त्रांसाठी पूर्णपणे आयातीवर अवलंबून होतो, मात्र आज आपण जगातील सर्वोत्तम ड्रोन्स आणि मिसाईल्स भारतात तयार करत आहोत. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न आज सत्यात उतरताना दिसत आहे.”

गणेश निबे यांच्या कार्याचे कौतुक

या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे सुपुत्र आणि संरक्षण क्षेत्रातील उद्योजक गणेश निबे यांच्या कर्तृत्वाचा विशेष गौरव केला. देशाच्या सुरक्षेसाठी निबे यांनी केलेले कार्य महाराष्ट्र आणि संपूर्ण देशासाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

गणेश निबे यांच्या कार्याचे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले, “महाराष्ट्राच्या मातीतील एका युवकाने संरक्षण क्षेत्रात उभे केलेले काम संपूर्ण देशासाठी गौरवास्पद आहे. आपल्याकडे ७० किमी रेंजपासून थेट ४००-५०० किमी रेंजपर्यंत मारा करणारी शस्त्रे उपलब्ध नव्हती. हा मोठा तांत्रिक ‘गॅप’ भरून काढण्याचे काम गणेश निबे यांनी केले आहे. निबे यांनी १५० किमी आणि ३०० किमी रेंजपर्यंत अचूक मारा करू शकणारी स्वदेशी शस्त्रे तयार करून भारताच्या सामर्थ्यात भर घातली आहे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *