![]()
राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या नाशिकमधील ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणाचे थेट कनेक्शन आता छत्रपती संभाजीनगरशी जोडले गेले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला पोलिसांपासून वाचवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याप्रकरणी, एमआयएमचा नगरसेवक मतीन
.
या प्रकरणाचा तपास करत असताना नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मतीन पटेल याच्याविरुद्ध आरोपीला बेकायदेशीरपणे आश्रय दिल्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईअंतर्गत पटेलला शोधण्यासाठी नाशिक पोलिसांचे एक पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले होते, मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नाही. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत नाशिक रोड न्यायालयात मतीन पटेल, निदा खान आणि इतर चार संशयितांविरुद्ध सविस्तर दोषारोपपत्र दाखल केले आहे. दोषारोपपत्र दाखल होताच गुन्हे शाखेच्या पथकाने पटेलला थेट नोटीस बजावली, ज्यामुळे त्याने नरमाईची भूमिका घेत पोलिसांसमोर हजर होण्याची तयारी दर्शवली असल्याचे सूत्रांकडून कळते.
आधी ‘पाहुणचार’, आता नोटिसीचा दणका
या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला जेव्हा छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली होती, तेव्हा पोलिसांच्या पथकाने नगरसेवक मतीन पटेल यालाही ताब्यात घेतले होते. त्या वेळी त्याची कसून चौकशी करत पोलिसांनी त्याचा यथोचित ‘पाहुणचार’ केला होता. मात्र, त्या क्षणी त्याच्यावर रीतसर गुन्हा दाखल नसल्याने आणि थेट अटक केल्यास त्याला लगेच जामीन मिळण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्याला सोडून दिले होते. आता मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून थेट नोटीस बजावल्याने त्याला स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन व्हावे लागणार आहे.