Headlines

विकृत प्रकरणात पंतप्रधानांचे नाव सहन करणे सहनशीलतेचा पराकोट:हर्षवर्धन सपकाळ यांचे फुले, गांधी, नेहरू विचारमंचच्या व्याख्यानात आवाहन




महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे की, एफस्टिन फाईलसारख्या विकृत प्रकरणात पंतप्रधानांचे नाव असूनही आपण त्यांना सहन करतो, ही आपल्या सहनशीलतेची पराकाष्ठा आहे. आता रस्त्यावर उतरून सविनय सत्याग्रह करण्याशिवाय कोणताही मार्ग दिसत नाही. त्यांनी ‘दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्यासाठी’ तयार राहण्याचे आवाहन केले. सपकाळ रविवारी (२४ मे) पिंपरी येथे फुले, गांधी, नेहरू विचारमंचने आयोजित केलेल्या ‘महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद’ या विषयावरील व्याख्यानाच्या समारोपावेळी बोलत होते. यावेळी सेवाग्राम आश्रमाचे सचिव आणि ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत विजय तांबे, आयोजक दाहर मुजावर, अक्षय शहरकर, केनिथ रेमी तसेच विष्णू नेवाळे, अशोक मोरे, अमरसिंह नाणेकर, मिलिंद फडतरे, किरण खाजेकर, मयूर जैस्वाल, गौरव चौधरी, अनिरुद्ध कांबळे, नरेंद्र बनसोडे, हभप सांगोळे, चैतन्य रणदिवे, महेश पाटील, बाबासाहेब पाटील, गिरिजा कुदळे आदी उपस्थित होते. सपकाळ यांनी ‘राष्ट्र’ या संकल्पनेवरही भाष्य केले. सध्या ‘राष्ट्र’ म्हणजे ‘मी, माझी जात, माझा धर्म’ असा संकुचित विचार वाढत आहे. पेट्रोल, डिझेल २०० रुपये प्रति लिटर झाले तरी चालेल, पण मोदी आणि भाजप पाहिजे, अशी विचारसरणी म्हणजे ‘मानसिक दिवाळखोरी’ आहे, असे ते म्हणाले. या स्थितीला आपणच जबाबदार आहोत, असे मानणारा मी एक कार्यकर्ता आहे, असेही त्यांनी नमूद केले. ‘कॉक्रोच पार्टी’ निर्माण होणे हे आपल्यासारख्या तरुण विचारांच्या संघटनांचे अपयश आहे. आपला मेंदू पुन्हा गुलाम करण्याची प्रक्रिया सुरू आहे, आणि हे बहुतेकांना आवडते कारण त्यांना ‘कम्फर्ट झोन’मध्ये राहायचे आहे, असे सपकाळ म्हणाले. यात बदल झाल्याशिवाय कोणतीही क्रांती होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या बहुतांश लोक कार्यकर्ते किंवा नागरिक म्हणून नव्हे, तर निरीक्षक, परीक्षक, समीक्षक, उपदेशक, मार्गदर्शक आणि पर्यवेक्षक याच भूमिकेत राहू इच्छितात. आपल्यात एकवाक्यता नाही आणि प्रत्येकात ‘मी’ पणा आहे. आपण सर्वांनी आता कृतीशील झाले पाहिजे. फुले, नेहरू, गांधी यांना अपेक्षित असलेल्या राष्ट्रवादासाठी सत्याग्रह केला पाहिजे, असे आवाहन करून हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या व्याख्यानाचा समारोप केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *