![]()
तालुक्यातील लामनगाव येथील काळे व मालोदे वस्तीवरील नागरिकांचे ४० वर्षांपासून प्रलंबित हक्काच्या रस्त्यासाठीचे आमरण उपोषण मंगळवारी सुटले. आमदार प्रशांत बंब यांच्या हस्तक्षेपानंतर तहसील प्रशासनाने मंगळवारी सकाळी रस्ता मोकळा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतले. सोमवारी खुलताबाद तहसील कार्यालयासमोर आंदोलन झाले. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले. ४० हून अधिक नागरिक उपस्थित होते. “रस्ता द्या, अन्यथा जीव घ्या” अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी वह्या-पुस्तके घेऊन उपोषण मंडपातच अभ्यास केला. तहसील कार्यालयासमोर भरलेली ही ‘शाळा’ लक्षवेधी ठरली.आंदोलनात संजय गणपत काळे, दिगंबर जानकिराम काळे, दत्तू दशरथ मालोदे, विलास बाबूराव मालोदे, फकिराव उत्तमराव मालोदे सहभागी होते.
Source link
लामनगावातील काळेआणि मालोदे वस्तीकरांचे आमरण उपोषण मागे:मंगळवारी रस्ता मोकळा करण्याचे आश्वासन, 40 वर्षांचा संघर्ष सुटला