![]()
गतवर्षी पावसाळ्यात गटारी, नाले तुंबल्याने कुर्डुवाडी शहरातील रस्त्यांमध्ये पाणी साचले. त्यामुळे नागरिकांना जगणेही अडचणीचे ठरले. यंदाही समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी ओढे, नाले आणि अ
.
गतवर्षीच्या विदारक अनुभवातून धडा घेत, यंदा पावसाळ्यात शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कुर्डुवाडी नगरपालिकेने आतापासूनच कामे सुरू केली आहेत. प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व ओढे, मोठे नाले आणि अंतर्गत गटारींच्या साफसफाईचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून, अनेक भागांतील ड्रेनेजलाइन आणि सांडपाण्याच्या वाहिन्या स्वच्छ करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मागील दोन वर्षांमध्ये कुर्डुवाडी आणि परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील नाले, गटारी तुंबल्या होत्या. पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने अनेक सखल भागांत पाणी साचले होते. यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. हीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन, यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला आहे.
सर्व मुख्य नाल्यांमधील गाळ जेसीबीने उपसण्याचे काम वेगात पावसाचे पाणी शहरात कुठेही साचून राहू नये, यासाठी मुख्य नाल्यांमधील गाळ उपसणे आणि झाडी-झुडपे काढण्याचे काम सुरू आहे. शहरातील अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी सोमवारी सकाळपासूनच पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत ठिकठिकाणच्या ड्रेनेज लाइन , गटारी स्वच्छ केल्या जात आहेत.
लोकप्रतिनिधी स्वत: उतरले रस्त्यावर नगराध्यक्षा जयश्री भिसे, आरोग्यसभापती मोहसीन मकणू तसेच सर्व प्रभागातील नगरसेवक स्वतः प्रत्येक वार्डात फिरून कामाची पाहणी करत आहेत. पालिकेच्या या तत्परतेमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या थेट सहभागामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.