![]()
खुलताबाद भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद येथे प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक तहसीलदार संतोष गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत आरोग्य, वीज, सुरक्षा व्यवस्थेवर ठोस निर्णय घेण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, नगराध्यक्ष सय्यद आमेर पटेल यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि समाज बांधव उपस्थित होते. जयंती उत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्वंकष नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र वाघ यांनी मिरवणुकीतील आरोग्य व्यवस्थेचा मुद्दा ठळकपणे उपस्थित केला. मिरवणुकीदरम्यान २४ तास रुग्णवाहिका व वैद्यकीय पथके तैनात ठेवावीत, अशी त्यांनी आग्रही मागणी केली. यावर प्रशासनाने मिरवणुकीत रुग्णवाहिका व डॉक्टरांची व्यवस्था नक्की करण्यात येईल, असे आश्वासन दिले. उत्सव काळात वीज अखंडित राहावा यासाठी महावितरणला सूचना देण्यात आल्या. मिरवणूक मार्गावरील लोंबकळणाऱ्या विद्युत तारा दुरुस्तीचे आदेश दिले. नगर परिषदेला मिरवणूक मार्ग स्वच्छ ठेवणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आणि वाहतुकीची सोय सुरळीत राखण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन जाधव, माजी नगराध्यक्ष ॲड. एस. एम. कमर, नगरसेवक अनीस जागीरदार, ज्येष्ठ समाजसेवक आबेद जहागिरदार, शशिकांत मुसळे, दिनेश अंभोरे, कारभारी ढवळे, किशोर जाधव, रवींद्र ढवळे, विकास घाटे, अनिल घुसाळे, राहुल जाधव, अमोल ढवळे, स्वप्निल लोखंडे, महेंद्र घुसळे, राहुल बनकर, राजेश निकाळजे, मिलिंद जाधव, रोहित घुसाळे, छबू कांबळे आदींची उपस्थिती होती. खुलताबाद येथील बैठकीत बोलताना निरीक्षक धनंजय फराटे, समोर उपस्थित नागरिक. नियमांचे पालन करावे तहसीलदार संतोष गुट्टे आणि पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करत उत्सव निर्विघ्न पार पाडण्यावर भर दिला. शहरातील सर्व मंडळे व नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करून सामाजिक ऐक्य जपत जयंती साजरी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
Source link
खुलताबादेत शांतता समिती बैठकीची सांगता:नागरिकांच्या मागणीनंतर आरोग्य, वीज, सुरक्षा व्यवस्थेवर ठोस निर्णय