Headlines

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईला गती, पथदिव्यांचेही जिओ टॅगिंग करणार:पथदिवे देखभाल, दुरुस्ती पालिकाच करणार‎



मनपा स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षा व नागरी सुविधांशी संबंधित तीन निर्णय घेण्यात आले आहेत. पूर्व आणि उत्तर झोनमधील मोठ्या नाल्यांची सफाई करणे, शहरातील सर्व पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी लागणारे स

.

मनपा क्षेत्रातील एलईडी पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती व नवीन एलईडी लाइट्स लावणे, सीसीएमएसचा पुरवठा, स्थापना व देखभाल दुरुस्तीचा प्रस्ताव स्थायी समिती सभेत नामंजूर करण्यात आला. कारण यासाठी संबंधित कंपन्यांना दरमहा सुमारे ४७ लाख रुपये मोजावे लागले असते. हे पालिकेला परवडणारे नसल्याने हे काम पालिका उर्वरित पान ४ जिओ टॅगींग प्रकल्पांतर्गत प्रत्येक प्रभागातील दिव्यांची माहिती गोळा केली जाईल. जे विजेचे खांब सध्या रिकामे आहेत तेथे तसेच जे दिवे जुने किंवा ज्यांचा प्रकाश कमी झाला आहे, ते तातडीने बदलण्यात येतील. बैठकीच्या शेवटी स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना ताकीद दिली की, सदस्यांच्या सूचनांचे पालन करावे. नालेसफाई योग्य झाल्याची खात्री करण्यासाठी सफाईपूर्वीचे व नंतरचे फोटो काढण्याची सूचनाही केली.

‘मॅपिंग’मुळे पथदिवे बंद पडल्यास त्वरित समजणार वेळेत आणि कमी खर्चात नालेसफाई झाल्यामुळे निधीची बचत होईलच, शिवाय पूर्व व उत्तर अकोल्यातील सखल भागांतील नागरिकांना जलमय होण्याच्या त्रासातून दिलासा मिळणार आहे. अंधार दूर करण्यासाठी पथदिव्यांचे सुसूत्रीकरण केले जाणार आहे. सर्व पथदिव्यांचे ‘जिओ टॅगिंग’ करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिओ टॅगिंगमुळे डिजिटल मॅपिंग तयार होईल. त्यामुळे एखादा दिवा बंद असल्यास त्याची अचूक जागा त्वरित समजेल आणि तो वेळेत दुरुस्त होईल.

सूचनांच्या पालनाचे निर्देश



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *