Headlines

‘अंबाडी’त केवळ 11 टक्के साठा; कन्नडला ग्रॅव्हिटीने पाणी येणे बंद:पंप खरेदी करणार, एक्सप्रेस फीडर कार्यान्वित‎




शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंबाडी प्रकल्पातील जलसाठा ११ टक्क्यांवर पोहचला असून, शहराला १० ते १२ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यात जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ग्रॅव्हिटीने येणारे पाणी बंद झाले असून, मंगळवारी नगराध्यक्षा फरीन बेगम, मुख्याधिकारी रविंद्र लांडे, नगरसेवक अब्दुल जावेद यांनी धरणास भेट देत पंप हाऊससह वितरण प्रणालीची माहिती घेतली. पाणी वितरणात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश नगराध्यक्षा बेगम यांनी यावेळी दिले. पाहणी दौऱ्यावेळी नगरसेवक प्रकाश अग्रवाल, अभियंता राहुल करडे, राजू शेख, गोकुळ राठोड, आकाश बोलधणे, बाजीराव थोरात, शिवा निकम, निलेश पाटील उपस्थित होते. २० एचपीचे ३, ७.५ एचपीचे ४ पंप खरेदी करणार मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी सांगितले की, पूर्वी अंबाडी धरणातून रोज ४० ते ४५ लाख लिटर पाणी येत होते, ते आता २२ ते २५ लाख लिटरवर आले आहे. सध्याचे साडेसात अश्वशक्तीचे पंप पाणी उपसा करण्यास अपुरे पडत आहेत. अंधानेर परिसरात कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने अडथळे येत आहेत. यावर उपाय म्हणून पालिकेने २० एचपीचे ३ आणि साडेसात एचपीचे ४ नवीन विद्युत पंप त्वरित खरेदी करण्याचा निर्णय घेतला. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी नवीन एक्सप्रेस फिडरची डागडुजी आणि ऑईल बदलण्याचे काम केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *