Headlines

अजितदादांनी 'देवराई'साठी शब्द दिला होता:पण आताचे आमदार फोनही उचलत नाहीत, अभिनेते सयाजी शिंदेंनी व्यक्त केली खंत




रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली होणाऱ्या बेसुमार वृक्षतोडीवर आणि प्रशासकीय अनास्थेवर तीव्र संताप व्यक्त करताना, मला कोणाच्या भ्रष्टाचारात किंवा प्रोटोकॉलमध्ये रस नसून केवळ झाडे जगवण्यात रस आहे, अशी रोखठोक भूमिका अभिनेते व सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी एका विशेष मुलाखतीत मांडली. या समस्येवर केवळ नाराजी न दर्शवता त्यांनी साताऱ्यात ‘झाडांच्या अनाथ आश्रमा’ची स्थापना केली असून, याच अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून आता संपूर्ण महाराष्ट्रभर वृक्षसंवर्धनाची आणि झाडे वाचवण्याची एक नवी, व्यापक चळवळ उभारण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांची एक आठवणही सांगितली आहे. मुलाखतीमध्ये बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, अजितदादांच्या मध्ये राजकारणात जेवढा धूर्तपणा लागतो तेवढा होता. पण काम करण्यासाठी जो मोकळेपणा लागतो तो सर्व होता. माझे दोन-तीन अनुभव होते, जी कामे सांगितली ती पूर्ण झाली. अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची पद्धत बाकीच्यांमध्ये आहे का नाही मला माहीत नाही. पण अजितदादांमध्ये ती होती. त्यावेळी मला दादांनी सांगितले होते की तुमच्या झाडांच्या चळवळीसाठी तुम्ही जर माझ्या पक्षात आला तर तुमचे काम अधिक सोपे होईल. सध्या आमच्या पक्षाची परिस्थिती ठीक नाही. यावेळी तुम्ही जेवढे आमदार निवडून द्याल तेवढे देवराई करू, असा शब्द अजितदादांनी दिला होता, पण अचानक ते गेले. पुढे बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, आता मी आमदारांना संपर्क करतोय, पण माझे ते फोन उचलत नाहीत. किंवा जेवढा सपोर्ट करणे गरजेचे आहे तेवढे होत नाही. हा महाराष्ट्राचा दुर्दैवाचा भाग आहे. देवगिरी ते देवराई हा प्रकल्प राबवण्याचा माझा विचार आहे. हा प्रकल्प मी सर्व आमदारांना दाखवणार आहे. किमान 10 हजार झाडे 40 आमदारांनी लावणे अपेक्षित आहे. एकनाथ शिंदेंच्या भेटीचा किस्सा सयाजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचाही एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकदा भेटण्याचा योग आला होता. त्यावेळी साताराचे तात्कालीन पोलिस अधीक्षक समीर शेख हे सहकार्य करत नसल्याचे सांगितले होते. मला धाडसासाठी सपोर्टची खूप गरज आहे पुढे सयाजी शिंदे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या विषयी जे बाहेर ऐकले जाते त्याचा मला नक्कीच अनुभव घ्यायचा आहे. कारण मला धाडसासाठी सपोर्टची खूप गरज आहे. याबाबत मी त्यांना लवकरच भेटून झाडांबाबत सहकार्य करण्याची विनंती करणार आहे. खरंतर एकनाथ शिंदे आणि मी स्वतः एकाच भागातील आहोत. साताऱ्यातील अकरा हिरे ज्यावेळेस आमचा सन्मान झाला होता त्यावेळेस आम्ही दोघे एकत्र आल्यावर एकनाथ शिंदे मूळचे सातारचे आहेत हे मला समजले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *