Headlines

निफाडला जिल्हा कबड्डी स्पर्धेत 24 संघांचा सहभाग:धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजन‎



क्रीडा प्रबोधिनी निफाड यांच्या वतीने स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. स्पर्धेत जिल्ह्यातील २४ संघांनी सहभाग नोंदवला होता. निफाडकर क्रीडाप्रेमींच्या उत्

.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना निफाड तालुकाप्रमुख तथा उपनगराध्यक्ष अनिल कुंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास डोळ्यांसमोर ठेवून शौर्य, जिद्द आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवा, असे खेळाडूंना आवाहन केले. या क्रीडा महोत्सवासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस संजय गाजरे, ज्येष्ठ मार्गदर्शक नंदलाल चोरडिया, क्रीडाप्रेमी स्वप्निल गोळे, भीमराव काळे, विलास निरभवणे आणि राजेंद्र सोमवंशी यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या आयोजनासाठी तालुक्यातील ग्रामस्थ, नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि क्रीडारसिकांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे आयोजकांनी सांगितले. निफाड येथे कुस्ती स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसांचे वितरण करताना मान्यवर.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *