![]()
अधिक तथा पुरुषोत्तम मासातील पवित्र कमला एकादशी निमित्त पंढरपूर नगरीत भक्तीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. या निमित्ताने पंढरीत तीन ते चार लाख भाविकांची गर्दी झाली होती. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नयनरम्य आणि आकर्षक फुलांची भव्य सजावट करण्यात आली असून, अवघी पंढरी राम कृष्ण हरी च्या जयघोषाने दुमदुमली आहे. बुधवारी भाविकांच्या अलोट गर्दीमुळे दर्शन रांग ६ व्या शेड मधून थेट गोपाळपूर रोडवर आली होती. मंदिराचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरातील चौखांबी, सोळखांबी, श्री संत नामदेव पायरी, व्हीआयपी गेट यांसह इतर प्रमुख ठिकाणी सुमारे एक ते दीड टनफुले वापरून ही आकर्षक सजावट करण्यात आली आहे. अधिक महिना आणि कमला एकादशीचे औचित्य साधून पंढरपुरात सुमारे तीन ते चार लाख भाविक दाखल झाले होते. यामुळे चंद्रभागा नदीचा घाट, प्रदक्षिणा मार्ग, महाद्वार आणि मंदिर परिसरात वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गोपाळपूर रोडपर्यंत दर्शन रांग विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाल्यामुळे दर्शन रांग ६ व्या शेड मधून थेट गोपाळपूर रोडवर गेली होती. चंद्रभागा स्नान आणि जयघोष पवित्र एकादशीनिमित्त चंद्रभागा नदीवर स्नानासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. शहरातील सर्व मंदिरे, मठ आणि धर्म शाळांमधून केवळ आणि केवळ राम कृष्ण हरी चा अखंड जयघोष ऐकू येत होता. फूलांच्या सजावटीचा सुवास आणि विठ्ठल नामाचा गजर यांमुळे मंदिर परिसर आणि संपूर्ण पंढरपूर नगरीच आध्यात्मिक रंगात न्हाऊन निघाली होती . पुण्यातील राम जांभुळकर यांच्या चित्तवेधक सजावटीमुळे विठ्ठल मंदिराचे रुप लोभस मंदिरातील ही नयनरम्य व आकर्षक फुलांची सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी सेवाभावी तत्त्वावर केली आहे. विठूरायाच्या चरणी भक्ती भाव अर्पण करण्यासाठी त्यांनी तब्बल २२ प्रकारची देशी-विदेशी फुले आणि पानांचा वापर करून केलेल्या या चित्ताकर्षक सजावटीमुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे रूप अधिकच लोभस बनले हाते .
Source link
पंढरीत कमला एकादशी निमित्त 4 लाख भाविक:अभूतपूर्व उत्साह, अधिक मासातील पवित्र एकादशी, 1.5 टन फुलांनी मंदिर उजळले