![]()
जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, शिस्त आणि वेळेचे योग्य नियोजन आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच चांगले संस्कार आत्मसात करून समाजात आदर्श नागरिक म्हणून वावरण्याचे आवाहन त्यांनी केले. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळ अंतर्गत गुरुकुंज येथे आयोजित करण्यात आलेल्या जीवन विद्या सुसंस्कार शिबिरात ते बोलत होते. या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरामध्ये विविध मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. मंचावर डॉ. दिंगाबर निंघोट, वाडेकर नॅशनल स्कुलचे संचालक डॉ. रघुनाथ वाडेकर, श्री गुरुदेव विद्या मंदिरचे प्राचार्य मनोज कडू, माधुरी नीमकर, पत्रकार हेमंत निखाडे आदी मान्यवर उपस्थित होते. उपाध्याय पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांना शिस्त, नैतिक मूल्ये, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व पटवून देणे ही काळाची गरज आहे. आजच्या आधुनिक युगात मोबाईल व सोशल मीडियाचा वाढता वापर विद्यार्थ्यांच्या जीवनावर परिणाम करत असल्याचे नमूद करत त्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याचा सल्लाही दिला. शिवाय व्यसनमुक्त जीवन, पालकांचा आदर, शिक्षकांविषयी सन्मान आणि देशभक्तीची भावना जोपासण्याचे महत्त्वही विशद केले. शिबिरात सहभागी झालेले विद्यार्थी पारंपरिक पांढऱ्या वेशभूषेत व भगव्या टोपीत शिस्तबद्ध पद्धतीने बसलेले दिसून आले. विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनपर भाषण लक्षपूर्वक ऐकत विविध प्रश्न विचारून आपली उत्सुकता व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक, शिक्षक व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारसरणी निर्माण होऊन शिस्तबद्ध जीवन जगण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल कडू यांनी केले, तर आभार मानव सेवा छात्रालयाचे अधीक्षक अमोल बांबल यांनी मानले. यावेळी कोषाध्यक्ष महादेव बेले, गोपाल कसर, धनश्री खंडारे, दिनेश हगवणे, गोपाल भालचक्र, ओकार पेंदोर मान्यवर उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमादरम्यान श्री गुरुदेव कलामंच सेवा मंडळ द्वारा दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. श्री गुरुदेव विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, वाडेकर नॅशनल स्कूल आणि रावसाहेब ठाकूर विद्यानिकेतन मोझरी या तीनही शाळेतील दहावी व बारावीतील १५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये श्रावणी सचिन चव्हाण, तुषार किशोर मुंगले, सिद्धी स्वप्निल साबळे, पुनम रवींद्र मोरे, कृष्णाई विजय धोटे, मनस्वी गजेंद्र कठाळे, ओम निलेश बालपांडे, उन्नती निलेश हगवणे, श्रावणी श्रीकृष्ण तिरमारे, अनुष्का दिनेश हगवणे, सृष्टी अविनाश तिखे, समीक्षा प्रभाकर जाधव, चंचल इंगळे यांचा समावेश आहे. प्रमुख पाहुण्यांचे हस्ते शाल, पुष्पगुच्छ व पेढा भरवून या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
Source link
गुरुकुंजात जीवन विद्यासंस्कार शिबिर:विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, राष्ट्रप्रेमाच्या जागृतीची गरज- गोपाल उपाध्याय