![]()
बार्शी तालुक्यातील पिंपरी (आर) येथे प्रेमसंबंधाच्या संशयातून एका २१ वर्षीय तरुणाला वारंवार मारहाण व मानसिक त्रास दिल्याचा प्रकार समोर आला असून, या त्रासाला कंटाळून संबंधित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी वैराग पोलिस
.
या प्रकरणी मृत तरुणाचा भाऊ हमराज राजुद्दीन पठाण यांनी वैराग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरीम याचे गावातील विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय संबंधित महिलेच्या पती व कुटुंबीयांना आला होता. त्यातूनच दि. १० मे रोजी आरीम याला गौडगाव येथील नागोबा चौकात अडवून मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला पिंपरी (आर) येथील संबंधितांच्या घरासमोर नेऊन बेल्ट, काठी व चप्पलने बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी त्याचा मोबाइलही जबरदस्तीने काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपींनी १० मे च्या मारहाणीनंतरही आरीमचा पिच्छा सोडला नव्हता. दि. ११ मे, १६ मे आणि २६ मे रोजीही संबंधित आरोपींनी घरी जाऊन त्याला धमक्या दिल्या. तुला गावात राहू देणार नाही, तुला जगू देणार नाही, तुझे लग्न होऊ देणार नाही अशा प्रकारच्या धमक्यांमुळे आरीम मानसिक तणावाखाली होता. तपासादरम्यान पोलिसांना आरीमच्या पॅन्टच्या खिशात हस्तलिखित सुसाईड नोट आढळून आली. तसेच त्याच्या डाव्या हाताच्या तळहातावरही काही मजकूर लिहिलेला दिसून आला. सुसाईड नोटमध्ये संबंधित चार जणांकडून झालेल्या मारहाण, धमक्या आणि मानसिक त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात सलीम सवाल पठाण, कलीम सवाल पठाण, सवाल अहमद पठाण, आजमतबी सवाल पठाण (सर्व रा. पिंपरी (आर), ता. बार्शी) या चौघांविरुद्ध वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.