![]()
भारतातील निवडणुकांमध्ये उमेदवारी देताना बहुतांश राजकीय पक्ष ज्या मतदारसंघात ज्या जातीचे मतदार जास्त आहेत, त्याच समाजाच्या नेत्याला तिकीट देण्याची रणनीती वर्षानुवर्षे अवलंबत आले आहेत. मात्र, जातीपातीच्या या राजकीय गणितावर आणि तिकीट वाटपाच्या प्रथेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जोरदार टीका केली आहे. जातीच्या नावावर तिकीट मिळवणारा नेता संबंधित समाजाचा कधीही विकास करत नाही, अशा स्पष्ट शब्दांत गडकरी यांनी या प्रवृत्तीवर कडाडून हल्लाबोल केला आहे. नागपूर येथे चर्मकार समाजाच्या मेळाव्यात नितीन गडकरी बोलत होते. ते म्हणाले, समाजाचा विकास हा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानातून होत असतो. शिक्षणाचा संबंध कौशल्याशी आहे. शिक्षण हे कौशल्यपूर्ण असायला पाहिजे. कौशल्यातून अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे, आमच्या गावात साडी बनवण्याचे कौशल्यपूर्ण काम महिला करतात. एक साडी मी हेमा मालिनी यांना दिली, आता त्या तीच साडी घालून या महिलांच्या कार्यक्रमाला येणार आहेत. अनेक जण म्हणतात मी या जातीचा आहे. मला तिकीट द्या, पण ते समाजासाठी तिकीट घेतल्यावर काहीच करत नही. म्हणून समाजाच्या माणसालाच तिकीट मिळाले म्हणजे समाजाचा विकास होतो असे नाही, असे स्पष्ट मत गडकरी यांनी व्यक्त केले आहे. पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, सरकारकडून जे आम्हाला तुमच्या समाजासाठी करता येतं, ते आम्ही नक्की करू. मात्र तुम्हाला समाजात चांगले नेतृत्व निर्माण करायचे आहे. पटवर्धन नावाच्या व्यक्तीने चपला बनविण्याचा व्यवसाय थाटला, तो मोठा व्यवसाय करत आहे. आता ब्राम्हण पण चपला बनवायला लागले. तुमच्या समाजसोबत आमचे जुने नाते आहे. तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळी साथ दिली आहे. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. त्यांनी बोलताना संत रविदास महाराजांविषयी भाष्य केले. ते म्हणाले, मी नितीन गडकरी यांचं आभार मानले की, त्यांनी त्यांच्या मातोश्रीच्या नावाने चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याची सुरूवात 18 वर्ष पूर्वी केली आहे. सुरुवातीला या समाजातील जास्तीत जास्त मार्क मिळविणारे विद्यार्थी हे 80 ते 82 टक्के पर्यंत असायचे. आता ते 96 टक्के पर्यंत पोहचले. कोणताही व्यक्ती जन्माने मोठा होत नाही, तर तो ज्ञानाने होत असतो. त्यासाठी मन निर्मळ असायला पाहिजे, असा संदेश रविदास महाराज यांनी दिला आहे. गुरुग्रंथ साहेबमध्ये सुद्धा रविदास महाराज यांचे दोहे घेण्यात आले. जाती पाती पेक्षा माणसाची उन्नती कशी होईल हा विचार रविदास महाराज यांनी दिला. त्यांची जयंती आता सरकार मोठ्या प्रमाणात साजरा करून त्यांचे विचार समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचविणार आहे.
Source link
'जातीच्या नावावर तिकीट घेणारा नेता समाजाचा विकास करत नाही':केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा राजकीय रणनीतीवर हल्लाबोल