Headlines

वैजापूरला 25,256 रोहयो कामांना मंजुरी; मात्र, हजेरी नेटवर्क भरोशावर:कष्टाची मजुरी मिळणार की नाही याची शाश्वती मिळेना‎



तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत २५ हजार २५६ कामांना मंजुरी असली, तरी त्यापैकी केवळ ३ हजार ३६५ कामे पूर्ण झाली आहेत. ७ हजार ५२२ कामे बंद पडली आहेत. हजारो कामे संथगतीने सुरू आहेत. आता मनरेगा मजुरांसमोर आणखी एक नवे संकट उभे ठाकले आहे. शासनाने ऑनलाइन ह

.

एकीकडे रोजगार हमीच्या कामांचा गाजावाजा होत आहे. दुसरीकडे नेटवर्कच्या अभावामुळे ग्रामीण मजुरांची परीक्षा घेतली जात आहे. मनरेगाच्या नव्या नियमांनुसार काम सुरू होण्यापूर्वी आणि काम संपल्यानंतर मोबाईल अ‍ॅपवर फोटोसह हजेरी नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र अनेक डोंगरथडी, गंगथडी शिवारातील कामांच्या ठिकाणी नेटवर्क उपलब्ध नाही. त्यामुळे ऑनलाइन हजेरी प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याने मजुरामध्ये नाराजी आहे. महिलांच्या मजुरीवर टांगती तलवार मनरेगा कामांवर महिलांची संख्या मोठी आहे. हजेरी वेळेत न लागल्यास मजुरी रखडण्याची भीती त्यांना सतावत आहे. दिवसभर कष्ट करूनही पैशांची खात्री नसल्याने महिलांमध्ये नाराजी वाढत आहे. याबाबत प्रशासनाने तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे. ऑनलाइन हजेरीची अंमलबजावणी करताना ग्रामपंचायत, रोजगार सेवक, पंचायत समिती प्रशासनाचीही धावपळ होत आहे. अनेक ठिकाणी नेटवर्क शोधण्यासाठी कर्मचारी भटकंती करत असल्याचे चित्र आहे. रामेश्वर खरात, सहायक कार्यक्रम अधिकारी, रोहयो. वैजापूर

महिलांची मजुरी रखडली

हजेरी अपलोडला विलंब : ^ ऑनलाइन प्रणाली पारदर्शकतेसाठी सुरू केली . मात्र काही ठिकाणी नेटवर्क उपलब्ध नसल्याने हजेरी अपलोड करण्यास विलंब होतो. – राजेक शेख, रोजगार सेवक

Q. मनरेगा कामांवर नेटवर्कची अडचण येत आहे? A. ही समस्या अनेक गावांमधून येत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. Q. नवीन अॅप दिल्यानंतरही अडचणी कायम आहेत? A. सुरुवातीच्या अॅपमध्ये अडचणी येत होत्या. त्यामुळे पर्यायी अॅप दिले आहे. Q. नवीन अॅपमध्येही तांत्रिक अडचणी येत आहेत? A. अनेक रोजगार सेवकांकडून अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. Q. मजुरी अडकणार आहे? A. मजुरांचे नुकसान होऊ नये यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *