![]()
जुन्या वादाच्या कारणातून एकासराईत गुन्हेगार तरुणाने दगडूकोहकडे या ७३ वर्षीय वयोवृद्धाच्या छातीवर गावठी कट्ट्यातून अगदीजवळून गोळी झाडली. ही घटनाशुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास तालुक्यातील मोमीन आखाडायेथील बाळेश्वर डोंगर परिसरातघडली. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झालाअसून, या घटनेमुळे संपूर्ण राहुरीतालुक्यात प्रचंड भीतीचे वातावरणनिर्माण झाले आहे. दगडू गंगाराम कोहकडे (वय ७३वर्षे, रा. मोमीन आखाडा, राहुरी)असे गंभीर जखमी वृद्धाचे नाव आहे.ते नेहमीप्रमाणे शुक्रवारी ६ वाजेच्यासुमारास बाळेश्वर डोंगर परिसरातफिरण्यासाठी गेले होते. त्याच वेळीमोमीन आखाडा येथीलच सराईतगुन्हेगार प्रवीण कोहकडे हा समोरूनमोटरसायकलवर आला. त्याने दगडूकोहकडे यांना अडवून, तू माझ्यावरखूप गुन्हे दाखल केले आहेत, असेम्हणत जुन्या वादावरून वादघालण्यास सुरुवात केली.दोघांमधील हा वाद पाहता पाहता विकोपाला गेला. यावेळी प्रवीण कोहकडे याने गावठीकट्टा काढून दगडू कोहकडे यांच्या छातीवर गोळी झाडली. छातीत गोळीलागताच दगडू कोहकडे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले.गोळीबाराचा आवाज ऐकून धावून आलेल्या नातेवाईकांनी त्यांना तात्काळअहिल्यानगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असली, तरी त्यांची प्रकृतीचिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीसउपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारीजयदत्त भवर, आणि राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनीपोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मुख्य आरोपी कोहकडेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल गोळीबार करणारा मुख्य आरोपी प्रवीण बाबासाहेब कोहकडे हा परिसरातीलसराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीही घरफोडी, चोरी आणि आर्म ॲक्ट(बेकायदेशीर शस्त्र बाळगणे) यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.त्याने भरदिवसा केलेल्या या कृत्यामुळे मोमीन आखाडा परिसरातनागरिकांमध्ये दहशतीचे सावट पसरले आहे. या घटनेबाबत राहुरी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपीचा शोधघेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत.सराईत गुन्हेगाराला लवकरात लवकर बेड्या ठोकल्या जातील, असाविश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Source link
जुन्या वादातून 73 वर्षीय वृद्धावर गावठी कट्ट्यातून गोळीबार:वृद्धाची प्रकृती चिंताजनक, पोलिस पथके आरोपीच्या मागावर