Headlines

दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी महिलेचे मंगळसूत्र पळविले:कळमनुरी येथील घटना, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल




कळमनुरी येथील शासकिय विश्रामगृहा समोरील मार्गावर फिरत असलेल्या महिलेच्या गळ्यातील दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मंगळसुत्र पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कळणनुरी पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. २९ रात्री गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील तिरुपती नगर भागातील स्नेहा राऊत ह्या अधिक मास निमित्त धोंडे जेवणासाठी कळमनुरी येथे पाहुण्यांच्या घरी गेल्या होत्या. त्या ठिकाणी जेवन केल्यानंतर रात्री सात वाजण्याच्या सुमारास त्या पाय मोकळे करण्यासाठी मुख्य रस्त्यावर फिरत होत्या. दरम्यान, त्या घरापासून काही अंतरावर असलेल्या शासकिय विश्रामगृहाच्या समोरील मार्गावर आल्यानंतर दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी अंधाराचा गैरफायदा घेत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र ओढून पळ काढला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे त्या घाबरून गेल्या. यावेळी त्यांनी आरडा ओरड करून मदत मागितली मात्र तो पर्यंत दुचाकीवर आलेले चोरटे पळून गेल होते. सदर प्रकार त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी स्नेहा यांना घेऊन कळमनुरी पोलिस ठाणे गाठले. स्नेहा यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्यां विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक प्रेमकुमार माकोडे, उपनिरीक्षक सतीष ठेंगे, जमादार गजानन होळकर, लक्ष्मीकांत माखणे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर आज पोलिस उपाधिक्षक मयूर रसाळ, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दिलीप मोरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे. पोलिसांनी परिसरातील दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरु केली असून त्याद्वारे चोरट्यांनी ओळख पटविण्याचा प्रयत्न चालविला आहे. या शिवाय सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार दत्ता नागरे यांच्या पथकानेही घटनास्थळी भेट दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *