Headlines

मेंदी, प्री-वेडिंग शूट, बॅनरबाजीवर बंदी:सूर्यवंशी बारी पंच मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक




प्रतिनिधी | सोयगाव बारी समाजातील वाढत्या अनिष्ट चालीरीतींवर नियंत्रण आणण्यासाठी शिरसोली (जि. जळगाव) येथे सूर्यवंशी बारी पंच मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच घेण्यात आली. यात विवाह, साखरपुडा व इतर सार्वजनिक कार्यक्रमांमधील सामाजिकदृष्ट्या घातक प्रथा, अनिष्ट रूढी, परंपरा, अनाठायी खर्च टाळण्यासाठी बारी समाज एकवटला आहे. या प्रथा बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत वेळेवर लग्न लावणे, वैदिक पद्धतीने एकाच वेळेत विवाह पार पाडणे, मेंदी व प्री-वेडिंग शूट यांसारख्या नव्याने सुरू झालेल्या खर्चिक प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. बारी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा करणार बंद करण्यासाठी एकवटलेला समाज.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *