Headlines

शिक्षण क्षेत्रात क्रांतीसाठी "रयत' सर्वात उत्तम माध्यम:आमदार रोहित पवार




प्रतिनिधी | कर्जत शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी रयत शिक्षण संस्था हे सर्वात उत्तम माध्यम आहे. भविष्यात सर्व संकुलांमध्ये अत्याधुनिक सुविधा वाढवण्यावर आमचा भर असेल, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले . रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आमदार पवार यांची रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल कर्जत रयत संकुल व दादा पाटील महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात हा सोहळा झाला. प्राचार्य डॉ. संजय नगरकर म्हणाले, आमदार पवार यांची अध्यक्षपदी झालेली निवड आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. या सोहळ्याला सुभाषचंद्र तनपुरे, नामदेव राऊत, बाळासाहेब शिंदे, प्रा. किरण पाटील, आबासाहेब डमरे, विजय मोढळे आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *