- Marathi News
- National
- LDF And UDF Close Due To Increase In Rural Voting In Kerala, Record 85.64 In Assam, 78% Voting In Kerala After 39 Years
गौरव पांडेय/के.ए. शाजी | तिरुवनंतपुरम10 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

केरळमधील बंपर मतदानाने सर्वांनाच चकित केले आहे. यामुळे काँग्रेसप्रणीत यूडीएफ आनंदी, तर सत्ताधारी सीपीआयएमच्या नेतृत्वाखालील एलडीएफ आघाडीला धक्का बसला आहे.
याची ३ मुख्य कारणे दिसली :
१ अँटी इनकम्बन्सी: मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याविरोधात नाराजीची लाट. विजयन १० वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. या वेळी माकपविरोधात मुस्लिम मतदारही मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. २. नेतृत्वाची उणीव : माकपमध्ये विजयन यांच्यानंतर दुसऱ्या फळीतील नेतृत्वाची कमतरता आहे. अनेक नेत्यांनी भाजप-काँग्रेसमध्ये प्रवेश केला. केडर नाराज दिसले. ३. धार्मिक मुद्दे: सबरीमाला मुद्द्यावर राज्य सरकारच्या भूमिकेमुळे लोकांमध्ये तीव्र संताप आहे. तसेच सबरीमाला मंदिरातील सोने चोरीचा मुद्दाही मोठा ठरला असून महिला मतदार नाराज असल्याचे दिसते.
१२६ पैकी ९२ जागांवर ८९% पर्यंत मतदान, त्यामुळे स्थिती स्पष्ट नाही…
डी. कुमार. गुवाहाटी| आसामच्या १२६ विधानसभा जागांपैकी १९ जागांवर ९०%, ९२ जागांवर ८०-८९% तर उर्वरित जागांवर ७०-७९% पेक्षा जास्त मतदान झाले आहे. तर येथे आतापर्यंत झालेल्या मतदानामध्ये मतदानाची टक्केवारी ७० ते ७५% च्या दरम्यान राहिली आहे. अशा परिस्थितीत १०-१२% जास्त मतदान वाढणे चकित करते, परंतु कोणत्याही एका लाटेचे संकेत देत नाही. ज्येष्ठ राजकीय पत्रकार समीर के. पुरकायस्थ मते, गायक जुबीन गर्ग यांचा मृत्यूप्रकरणी न्यायाची मागणी हेही याचे कारण असू शकते.
१० जिल्ह्यांत मतदान वाढले, चुरशीची लढत
केरळच्या १४ पैकी १० जिल्ह्यांत ७०% पेक्षा जास्त मतदान झाले आहे. विशेषतः दक्षिण जिल्ह्यांमध्ये तिरुवनंतपुरम, कोल्लम, पथानामथिट्टा येथे ७५% चा आकडा पार होणे आश्चर्यकारक आहे, कारण हे भाग सहसा मागे असायचे. राजकीय विश्लेषक जे. प्रभाष यांच्या मते, ही वाढ निर्णायक ठरू शकते.
कुठे किती मतदान: सर्वाधिक मतदान पुद्दुचेरीमध्ये वाढले
राज्य जागा मतदार मतदान 2021 मध्ये किती वाढ केरळ 140 2.69 78.27% 74.06% +4.21% आसाम 126 2.50 85.64% 82.04% +3.60% पुद्दुचेरी 30 10.14 89.81% 77.9% +11.91%
(टीप : मतदानाची आकडेवारी रात्री ८ वाजेपर्यंत. केरळ-आसामचे मतदार कोटीत, तर पुद्दुचेरीचे लाखात)
दिव्य मराठी नेटवर्क. नवी दिल्ली | दोन राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशात गुरुवारी बंपर मतदान झाले. निवडणूक आयोगानुसार, रात्री ८ वाजेपर्यंत आसाममध्ये ८५.६४%, केरळमध्ये ७८.२७%, तर पुद्दुचेरीत ८९.८१% मतदान राहिले. आसाम व पुद्दुचेरीच्या इतिहासातील हे सर्वाधिक मतदान आहे. यापूर्वी आसाममध्ये २०१६ मध्ये ८४.७२%, तर पुडुचेरीमध्ये २०११ मध्ये ८५.५७% विक्रमी मतदान झाले होते. केरळमध्ये ३९ वर्षांपूर्वी म्हणजेच १९८७ मध्ये ८०% मतदान झाले होते. येथे २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा ४% जास्त मतदान झाले. दरम्यान, आसाममध्ये मतदानादरम्यान काही ठिकाणी किरकोळ हिंसाचार झाला, ज्यामध्ये ३० लोक जखमी झाले.