Headlines

युवकांनी तंबाखूमुक्त समाजासाठी पुढाकार घ्यावा:शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयातर्फे तंबाखूमुक्त दिनाच्या कार्यक्रमात कर्नल व्ही. एन. शुक्ला यांचे मत‎




प्रतिनिधी |अकोला जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि ११ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती अभियान राबवण्यात आले. अभियानाचे उद्घाटन प्रमुख अतिथी कर्नल व्ही. एन. शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या शारीरिक, मानसिक, सामाजिक दुष्परिणामांवर प्रकाश टाकत युवकांनी तंबाखूमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. जुने शहरातील श्रीवास्तव चौक, मार्केट परिसर, जुने शहर, डाबकी रोड येथे तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांविषयी व्यापक जनजागृती अभियान राबवण्यात आले. अभियानादरम्यान एनसीसी कॅडेट्सनी जनजागृती फलक, घोषवाक्ये, नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम समजावून सांगितले. तसेच नागरिकांना तंबाखू सेवन न करण्याची शपथ देण्यात आली. हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एम. साबू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. पीयुष यू. नाल्हे अभियानात एनसीसी कॅडेट्स, प्राध्यापकवृंद व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या जनजागृती अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद लाभला. तंबाखूमुक्त समाज निर्मितीसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *