Headlines

आधुनिक युगात स्पर्धेला तोंड देत विद्यार्थ्यांनी ध्येय गाठावे:आमदार संग्राम जगताप यांचे आवाहन, बोरुडे मळ्यात मान्यवरांनी 400 गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार‎



गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारातून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली असून विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर

.

या सोहळ्याला माजी उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, पुष्पाताई बोरुडे, डॉ. रणजीत सत्रे, मनीष अहुजा, अभिजित बोरुडे, स्वप्निल बोरुडे, प्रदीप बोरुडे यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी ४०० विद्यार्थ्यांना सन्मानचिन्हे देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यात आली. उपमहापौर ॲड. जाधव म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशामागे आई-वडिलांचे मोठे योगदान असते. पालकांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारावी. माजी महापौर वाकळे म्हणाले, राजकारणात जनतेचे प्रश्न सोडवताना जसे सातत्य लागते, तसेच सातत्य विद्यार्थ्यांनी अभ्यासात आणि शिस्तीत ठेवले पाहिजे; तेच यशाचे गमक आहे. माजी महापौर फुलसौंदर म्हणाले, आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश नक्कीच मिळते. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते आणि राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून बोरुडे यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

२० वर्षांची ज्ञान-चळवळ; मुलींची संख्या अभिमानास्पद : पुष्पा बोरुडे माजी सभापती पुष्पा बोरुडे म्हणाल्या, प्रभागाच्या विकासकामांसोबतच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करणारा हा उपक्रम गेली दोन दशके सातत्याने राबविला जात आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत मुलींची वाढती संख्या ही अत्यंत अभिमानाची बाब असून आज मुली सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *