Headlines

महाराष्ट्र सरकार अत्यंत असंवेदनशील:प्रचंड घोडेबाजार होणार म्हणून पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीतून मविआची माघार- सुप्रिया सुळे




महाराष्ट्र सरकार हे कमालीचे असंवेदनशील असून ते राज्यातील जनतेच्या गंभीर प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही. सध्या देश आणि महाराष्ट्र दोन्हीही मोठ्या आर्थिक अडचणीतून जात असून, आगामी काळात राज्यासमोर मोठी आर्थिक आव्हाने उभी ठाकणार आहेत. सरकारने इतर गोष्टींपेक्षा या महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष देणे गरजेचे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्यातच राज्यातील आरक्षणाचा मुद्दा असो की शेतकऱ्यांचे प्रश्न, हे सरकार सर्वच बाबी चुकीच्या पद्धतीने हाताळत असून यामुळे राज्यात विनाकारण जाती-जातींमध्ये वाद निर्माण होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुणे विधान परिषदेची जागा लढायची नाही हे मविआतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी मिळून घेतलेला निर्णय आहे. आमची त्यादिवशी बैठक झाली त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रचंड घोडेबाजार पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी होणार अशी चर्चा होती त्यामुळे आम्ही या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. सरपंच ते लोकसभेपर्यंत हात वर करत मतदान व्हावे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात विधान परिषदेच्या 8 जागांवर मविआच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामध्ये काही जण काँग्रेसचे सुद्धज्ञ आहेत ना. घोडेबाजार होऊ नये म्हणून आम्ही पुण्याचा निर्णय घेतला. सरपंच निवडीपासून ते थेट लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्वच ठिकाणी गुप्त मतदानाऐवजी ‘हात वर करून’ जाहीर मतदान पद्धत लागू झाली पाहिजे, यासाठी आपण संसदेत बिल आले तर त्यांचे स्वागत करू.लोकसभा आणि विधानसभेला आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ताकदीने लढणारच आहोत. सत्ताधाऱ्यांनी पैशाच्या जीवावर निवडणूक लढवू नये आणि यंत्रणेची भीती सुद्धा दाखवू नये. हा देश लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. विधान परिषद निवडणुकीत काहीच रंगत नव्हती. मला वाटले नव्हते की इतक्या मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होईल. रोहित पवारांनी अन्नत्याग करू नये सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पारदर्शकपणे निवडणूक झाल्यावर त्या निवडणुकीत मजा येते. विधान परिषदेच्या निवडणुकीत काहीच मजा नसते. राज्यसभेची निवडणूक झाली ती बिनविरोध झाली कारण हा सर्व गोष्टी संख्याबळावर आधारित असतात. पुण्यात आमच्याकडे दीडशे मते होती. कोण काय बोलते यावर आम्ही काय बोलणार नाही. शेतकरी कर्जमाफीसाठी रोहित पवारांनी अन्नत्याग करण्यापेक्षा वाटप होऊ द्यावे त्यानंतर आपण काही तरी वेगळी भूमिका घेऊन सरकारला जनतेच्या हिताची भूमिका घेण्यास भाग पाडू पण रोहित पवारांनी अन्नत्याग करू नये. इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, इंडिया आघाडीची 8 तारखेला बैठक आहे त्यासाठी काँग्रेसकडून आम्हाला निमंत्रण देण्यात आले आहे. मी स्वत: दिल्लीमध्ये या बैठकीसाठी जाणार आहे. सशक्त लोकशाहीमध्ये कोणीही पक्ष स्थापन करू शकते, त्यामुळे कॉकरोच पाटींच्या अभिजीत दिपके यांना आमच्या शुभेच्छा आहे. आम्ही कधीच दबावाचे राजकारण केले नाही- बावनकुळे सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आम्ही कुणी कधीही दबावाचे राजकारण केले नाही. काँग्रेस पक्षाने 65 वर्षे गुंडगिरीचे राजकारण केले.मधल्या काळात उबाठा आणि मविआच्या लोकांनी सरकारच्या मार्फत गुंडगिरीमार्फत निवडणूक लढवल्या.या राज्यातील एक तरी मतदार किंवा उमेदवार दाखवावा की ज्यांच्यावर आम्ही दबाव आणला आहे. यांना त्यांची लोकं सांभाळता येत नाही आणि म्हणून आमच्यावर आरोप करण्याचे काम करतात, असे म्हणत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *