![]()
“जगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी पर्यावरणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या काळात ‘पर्यावरण जगले तरच आपण जगू’ हे माणसाने वेळीच ओळखले पाहिजे. निसर्गाचे रक्षण करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे,”
.
यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना हभप अशोक महाराज बोंगाणे म्हणाले, “अध्यात्म, निसर्ग आणि विज्ञान या तीन गोष्टींचे संतुलनच भविष्यात मानवी जीवन सुखकर आणि सुरक्षित करू शकते. ऋषीमुनींच्या काळापासून आजपर्यंत सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे महत्त्व श्रेष्ठ राहिले आहे. त्यामुळे प्रत्येकाने पर्यावरणाचा ऱ्हास थांबवून वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.”
दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमांचा गौरव केला. ते म्हणाले, “आमच्या महाविद्यालयाची पर्यावरण जनजागृती ही ‘बेस्ट ऍक्टिव्हिटी’ (सर्वोत्कृष्ट उपक्रम) मानली जाते. आज पर्यावरणीय असमतोल मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यावर मात करण्यासाठी केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणेही गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
फक्त वृक्षारोपण नव्हे तर संगोपनही महत्वाचे दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमांचा गौरव केला. ते म्हणाले, “आमच्या महाविद्यालयाची पर्यावरण जनजागृती ही ‘बेस्ट ऍक्टिव्हिटी’ (सर्वोत्कृष्ट उपक्रम) मानली जाते. आज पर्यावरणीय असमतोल मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यावर मात करण्यासाठी केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणेही गरजेचे आहे.”