Headlines

गंगापूर, खंडाळा, शिऊर येथे 30 मिनिटे पाऊस:विजांचा कडकडाट, मशागत कामांना येणार वेग‎




गंगापूर, वैजापूर तालुक्यातील खंडाळा, शिऊर आणि गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशनसह शिल्लेगाव परिसरात शुक्रवारी सायंकाळी ८ वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. ३० मिनिटे चाललेल्या या पावसामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, शेतात काढून ठेवलेले कांदे झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. दरम्यान, या पावसामुळे आता खरीप हंगामासाठी शेती मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. वैजापूर तालुक्यातील खंडाळा परिसरातील शेतकऱ्यांची खरीपपूर्व मशागत पूर्ण झाली असून, गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. त्यात ५ जुन रोजी सायंकाळी खंडाळ्यात प्रथमच पावसाला सुरुवात झाली. त्यापुर्वी वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित शुक्रवारी दुपारपासून ढगाळ वातावरण होते. त्यात सायंकाळी ६ वाजेनंतर वादळी वारे सुरू झाले. तर रात्री ८ ते ८.३० या वेळेत विजांच्या कडकडाटासह ३० मिनिटे पावसाने हजेरी लावली. वादळी वारे सुरू होताच लासूर स्टेशन, शिल्लेगाव, खंडाळा, शिऊरला वीजपुरवठा खंडित झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *