![]()
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अरुण हनुमंत लखानी हे बिनविरोध निवडून आले आहेत. उद्योग क्षेत्रात सक्रिय असलेले लखानी हे कोट्यधीश आहेत. त्यांच्याकडे तब्बल ४५ कोटी २८ लाख ३९
.
विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीच्या नावेही ३० कोटी ९९ लाख १६२ रुपयांची मालमत्ता असल्याने हे दांपत्य मिळून ७६ कोटी रुपयांहून अधिक संपत्तीचे मालक असल्याचे स्पष्ट झाले आहे. लखानी हे राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंचे व्याही आहेत.
शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांच्याकडे २४.३५ कोटींची संपत्ती
नाशिकचे शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या अधिकृत प्रतिज्ञापत्रातून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण जंगम व स्थावर मालमत्ता, बँक ठेवी आणि व्यावसायिक भागीदारी समोर आली असून एकूण कुटुंबीयांची संपत्ती २४ कोटी ३५ लाखांच्या घरात आहे.
जंगम मालमत्ता
नरेंद्र दराडे यांच्या नावावर ३ कोटी ४२ लाख ३६ हजार ३७४ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांची पत्नी सुरेखा दराडे यांच्याकडे ४ कोटी २९ लाख ९ हजार ४८३ रुपयांची आणि हिंदू अविभक्त कुटुंबाच्या नावे ९ लाख १८ हजार ७२० रुपयांची जंगम मालमत्ता आहे. यामध्ये टोयोटा फॉर्च्युनर कार, स्कूल बस आणि सोन्याच्या जडजवाहिरांचा समावेश आहे.
स्थावर मालमत्ता
चालू बाजारमूल्यामध्ये पत्नी सुरेखा दराडे या पतीपेक्षा श्रीमंत ठरल्या आहेत. नरेंद्र दराडे यांच्या नावे ६ कोटी ४६ लाख ८३ हजार २७५ रुपयांची शेतजमीन, बिगरशेती जमीन आणि इमारती आहेत, तर त्यांची पत्नी सुरेखा दराडे यांच्याकडे तब्बल १० कोटी १ लाख १५ हजार ५० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. कुटुंबाची एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून नरेंद्र दराडे यांच्याकडे ९.८९ कोटी, पत्नीकडे १४.३० कोटी आहे.
लखानींचे उत्पन्न व व्यवसाय
अरुण लखानी आणि त्यांची पत्नी दोघेही बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रात कार्यरत आहेत. आर्थिक वर्ष २०२४-२०२५ च्या प्राप्तिकर विवरणपत्रानुसार अरुण लखानी यांचे वार्षिक उत्पन्न २१,६३,८८,१०० (२१.६३ कोटी) इतके दाखवले गेले आहे, तर त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न ₹४,४१,५२,४६० (४.४१ कोटी) इतके आहे.
स्थावर आणि जंगम मालमत्तेचा तपशील
1. अरुण लखानी : जंगम संपत्ती : ४५,२८,४९,१२८ (४५.२८ कोटी). यामध्ये ४.१३ कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने आणि वस्तूंचा समावेश आहे. 2. स्थावर संपत्ती (सध्याचे बाजारमूल्य) : २४,००,७८,४९० (२४ कोटी) 3. त्यांच्या पत्नीच्या नावावरील : जंगम संपत्ती: ३०,९९,८४,१६२ (३०.९९ कोटी). यामध्ये तब्बल ८ कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने आणि डायमंड्स समाविष्ट आहेत. 4. स्थावर संपत्ती (सध्याचे बाजारमूल्य): ३६,०५,१३,७१६ (३६.०५ कोटी). मुंबईतील मलबार हिल आणि नागपुरात त्यांच्या नावावर आलिशान फ्लॅट्स आहेत.
कर्ज आणि दायित्व असे
अरुण लखानी यांच्यावर विविध बँकांचे २,०२,७२,१८७ चे गृहकर्ज आहे, तर त्यांच्या पत्नीच्या नावावर १३,६६,६३,४७२ चे दायित्व असून हे त्यांनी अरुण लखानी यांच्याकडूनच घेतलेले असुरक्षित कर्ज आहे. कोणत्याही शासकीय विभागाची थकबाकी त्यांच्यावर नाही.