Headlines

Retired Cop Kisan Patil Grows Worlds Costliest Miyazaki Mangoes in Jalgaon


पारंपरिक शेतीला फाटा देत काहीतरी वेगळे करण्याची जिद्द मनात असेल, तर मातीतून सोने पिकवता येते हे जळगावच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. स्थानिक गुन्हे शाखेतून निवृत्त झालेले आणि मूळचे नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील असलेले किसन नजन पाटील यां

.

पहिल्याच बहारात त्यांनी तब्बल 8 किलो आंब्यांचे यशस्वी उत्पादन घेतले असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या आंब्याला प्रति किलो 3 लाख रुपयांपर्यंतचा उच्चांकी भाव मिळतो. भारताला याला दीड ते दोन लाख रुपये किलोचा भाव मिळतो.

निवृत्तीनंतर शेतीमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याचा निश्चय पाटील यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी देशातील विविध नामांकित नर्सरींना भेटी दिल्या. या शोधमोहिमेदरम्यान त्यांना हैदराबाद येथील एका नर्सरीमध्ये ‘मियाझाकी’ आंब्याचे रोप आढळले. अत्यंत महागडे म्हणजेच प्रति रोप 10,000 रुपये या दराने त्यांनी 4 वर्षांपूर्वी 3 रोपे विकत आणली. अत्यंत प्रतिकूल हवामानातही योग्य काळजी, सेंद्रिय खतांचा वापर आणि नियमित सिंचन व्यवस्थापनाच्या जोरावर त्यांनी ही झाडे जगवली.

यंदा या झाडांना पहिलाच बहर आला आणि 8 किलो फळांचे दर्जेदार उत्पादन हाती आले. हा आंबा गडद लाल-जांभळ्या रंगाचा आणि अंड्यासारख्या आकाराचा असून, जपानमध्ये याला ‘ताइयो-नो-तामागो’ म्हणजेच ‘सूर्याचे अंडे’ असेही म्हणतात. महाराष्ट्रात प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यातील भोसी गावच्या नंदकिशोर गायकवाड या तरुण शेतकऱ्याने फिलिपाइन्समधून रोपे मागवून याची यशस्वी लागवड केली. हा आंबा प्रामुख्याने जपान, सौदी अरेबिया, दुबई आणि युरोपीय देशांमध्ये ‘लक्झरी गिफ्ट’ किंवा स्टेटस सिम्बॉल म्हणून कॉर्पोरेट जगतात भेट देण्यासाठी खरेदी केला जातो.

भारतात या आंब्याला मुंबई, दिल्ली, पुणे यांसारख्या मेट्रो शहरांमधील पंचतारांकित हॉटेल्स, हाय-एंड एक्झॉटिक फ्रूट मार्केट किंवा थेट ऑनलाइन ऑर्डर्स (जसे सौदी किंवा इतर देशांतून थेट शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ऑर्डर्स) याद्वारे बाजारपेठ मिळत आहे. आंब्यात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स, बीटा-कारोटिन आणि फॉलिक ॲसिड असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

असे आहे खर्च-उत्पन्नाचे गणित

मियाझाकी आंबा हा जगातील सर्वात महागडा आंबा आहे. पाटील यांनी प्रतिनग 10 हजारांप्रमाणे तीन रोपे आणली. पहिल्या बहरात आठ किलो आंबे आले. भारतीय बाजारात याला दीड ते दोन लाख रुपये प्रतिकिलो दर मिळतो. पण यंदा पहिल्या बहरातील आंबे विकण्याऐवजी त्यांनी कुटुंब आणि मित्रमंडळींमध्ये ते आंबे भेट दिले. या आंब्याला अमेरिका, इंग्लड, सौदी, दुबई येथेच मोठी मागणी आहे. पुढील वर्षी आंबा निर्यात करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

(प्रगतिशील शेतकरी किसन पाटील यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 7350515858 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधता येईल.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *