Headlines

कळमनुरी खून प्रकरण:पावने दोन महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा नगरसेवक अटकेत, तीन दिवसांची पोलिस कोठडी




कळमनुरी शहरातील जूने बसस्थानक परिसरातील खून प्रकरणात मागील दोन महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या नगरसेवक किशोर भालेराव यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याला शुक्रवारी ता. ११ कळमनुरी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची तीन दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कळमनुरी येथील जूने बसस्थानक परिसरात ता. १५ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास एका गटाने गोळीबार केला होता. या गोळीबारात लुकमान सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात १६ जणांवर खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये कळमनुरी पालिकेचे नगरसेवक कैलास भालेराव याचाही समावेश आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी धरपकड मोहिम सुरु केली होती. यामध्ये पोलिसांनी ११ जणांना अटक केली होती. मात्र मुख्य आरोपी असलेले चौघे जण फरार झाले होते. मागील दोन महिन्यांपासून पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणात मागील दोन महिन्यापाासून फरार असलेला नगरसेवक किशोर भालेराव हा सतत जागाबदलून पोलिसंना गुंगारा देत होता. दरम्यान, गुरुवारी ता. १० तो परभणी जवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, पोलिस निरीक्षक जमीर नाईक, सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत आरसेवार यांच्या पथकाने तातडीने परभणी जवळ एका ठिकाणी छापा टाकून त्याला अटक केली. त्याला आज कळमनुरी येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची तीन दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या १२ झाली असून उर्वरीत चौघांचा अद्यापही शोध सुरु आहे. त्यासाठी पोलिसांची दोन पथके कार्यरत ठेवण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *