![]()
तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांच्या पाठबळामुळे लोकसभेत आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) संख्याबळ ३१३ वर गेले आहे.परंतु तृणमूलच्या पाठिंब्याने शिंदेसेनेचे महत्त्व कमी होणार आहे. शिंदेसेनेचे ७ खासदार असून यापूर्वी पुरेशा संख्याबळाअभावी शिंदेसेनेचे दिल्लीतही राजकीय वजन होते. त्याचा लाभ त्यांना महाराष्ट्रातही होत होता. शिंदेसेनेच्या पाठिंब्याशिवाय एनडीएचे संख्याबळ ३०७ असे मजबूत होते. त्याशिवाय गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली भेट आणि मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या हालचालींमुळे ठाकरे गटाच्या भविष्यातील रणनीतीबद्दल राजकीय निरीक्षकांमध्ये उत्सुकता आहे. त्यात दिल्लीत सोमवारी पार पडलेल्या ‘इंडिया’आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष उपस्थिती टाळली. या घडामोडीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडकून टीका केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “इंडिया आघाडीत सामील झाल्यानंतर पराभव निश्चित असल्याचे आता या नेत्यांना उमजले आहे. यामुळेच हे नेते बैठकींपासून लांब राहणे पसंत करत आहेत. लोकसभेतील संख्याबळ भाजपचे 240
एनडीएचे 293 तृणमूलच्या 20 खासदारांसह एनडीए 313 होईल प. बंगाल निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसचे (तृणमूल) संकट संसदेपर्यंत पोहोचले आहे. पक्षाच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांच्या नेतृत्वाखाली २० खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून एनडीएला पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे. लोकसभेत २८ तृणमूल खासदार आहेत. बंडखोर खासदारांनी केंद्रीय मंत्री आणि बंगाल भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी बैठकही घेतली. या घडामोडी अशा वेळी झाल्या आहेत, जेव्हा तृणमूल अध्यक्षा ममता बॅनर्जी विरोधी आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत पोहोचल्या आहेत. तृणमूलचे ज्येष्ठ राज्यसभा सदस्य सुखेंदू शेखर रॉय यांनी पक्ष आणि संसद दोन्हीतून राजीनामा दिला. त्यांनी पक्षात भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला. त्यांचा राजीनामा राज्यसभा सभापतींनी स्वीकारला आहे. ममता यांनी २९ मे रोजी काकोली यांच्या जागी कल्याण बॅनर्जी यांना मुख्य प्रतोद बनवण्याचे पत्र पाठवले होते. बंडखोर खासदार म्हणाले, अधिकृत माहिती लोकसभा सचिवालयाला दिली गेली नाही. दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानी जमले बंडखोर खासदार; म्हणाले- आम्ही दोन तृतीयांशहून अधिक बंडखोर खासदारांच्या दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या घरी झालेल्या बैठकीची छायाचित्रेही समोर आली आहेत. यामध्ये हावडाचे खासदार प्रसून बॅनर्जी, बांकुराचे खासदार अनूप चक्रवर्ती, कूचबिहारचे खासदार जगदीश चंद्र बर्मा बसुनिया, बोलपूरचे खासदार असित माल, बीरभूमच्या खासदार शताब्दी रॉय आणि झारग्रामचे खासदार कालीपद सोरेन दिसले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या खासदारांनी वेगळा गट स्थापन करून एनडीएला पाठिंबा देण्याच्या रणनीतीवर चर्चा केली. त्यांचा दावा आहे की दोन तृतीयांशहून अधिक खासदार आमच्यासोबत आहेत. तृणमूलचे माजी मुख्य प्रवक्ते रिजू दत्ता यांनीही सोशल मीडियावर हे छायाचित्र शेअर केले आहे. या घडामोडी विधानसभेतील अलीकडच्या बंडखोरीच्या काही दिवसांनंतरच झाल्या आहेत. निवडणूक निकालानंतर ८० पैकी ५८ तृणमूल आमदारांनी पक्ष नेतृत्वाच्या विरोधात जाऊन हकालपट्टी झालेले आमदार रितब्रत बॅनर्जी यांना पाठिंबा दिला होता. नंतर विधानसभा अध्यक्षांनी रितब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली. बंगाल निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूलमधील असंतोष आणि गटबाजी उघडपणे समोर आली. माजी आमदार जहांगीर नेपाळ सीमेजवळ अटक माजी तृणमूल आमदार आणि फालता येथून निवडणूक लढलेले जहांगीर खान यांना प. बंगाल एसटीएफ आणि दार्जिलिंग पोलिसांनी नेपाळ सीमेजवळ अटक केली.
Source link
संकट गडद:ममतांना धक्का, आता तृणमूलच्या 20 खासदारांनी दिला एनडीएला पाठिंबा, बंगाल विधानसभेनंतर आता संसदेपर्यंत बंडखोरी