- Marathi News
- National
- CBSE OSM Controversy, 4 Out Of Every 10 Students Who Asked For Answer Sheets Demanded Paper Verification, Maximum Applications Came For Physics
नवी दिल्ली8 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

सीबीएसई ऑन स्क्रीन मार्किंग (ओएसएम) वादाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता १२ वीची परीक्षा देणाऱ्या दर चौथ्या विद्यार्थ्याने आपली उत्तरपत्रिका मागितली होती. आता पुढच्या टप्प्यात दर १० पैकी ४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला आहे. सीबीएसईच्या निकालानंतरच्या तक्रार नोंदणीच्या पहिल्या टप्प्यात ज्या ४.०४ लाख विद्यार्थ्यांनी आपल्या ११.३१ लाख उत्तरपत्रिका मागितल्या होत्या. दुसऱ्या टप्प्यात यापैकी १.६ लाख विद्यार्थ्यांनी ३.८ लाख उत्तरपत्रिकांच्या पडताळणी व पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला. सर्वाधिक तक्रारी फिजिक्स उत्तरपत्रिकेबाबत आहेत.
आयआयटी-मद्रास आणि आयआयटी-कानपूरच्या तज्ज्ञांच्या पथकाने सोमवारी सीबीएसईच्या नवीन मूल्यमापन साइटलाही वापरण्याची सुरक्षा मंजुरी दिली. विशेष म्हणजे बोर्डाने कोएम्टच्या साइटवरून स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिकांचा डेटा आपल्या साइटवर ट्रान्सफर केला. पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया ते आपल्याच साइटवर पार पाडतील. बोर्डाने ‘रोल नंबर नॉट फाउंड’ या तक्रारींवर स्पष्टीकरण दिले. बोर्डाने म्हटले, दुसऱ्या टप्प्यात त्याच विद्यार्थ्यांना पुढे अर्ज करण्याची संधी मिळाली, ज्यांनी पहिल्या टप्प्यात उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीसाठी अर्ज केला होता. ज्यांनी पहिल्या टप्प्यात अर्ज केला नव्हता व जे थेट दुसऱ्या टप्प्यात पडताळणी किंवा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू इच्छित होते, केवळ त्यांनाच ‘रोल नंबर नॉट फाउंड’चा मेसेज मिळत होता.
समिती पुन्हा तपासणार प्रश्न
1. पुनर्मूल्यांकनात आता काय? हा पेपर तपासणीचा अंतिम टप्पा आहे. यात केवळ तेच विद्यार्थी भाग घेऊ शकतात, ज्यांनी पहिल्या टप्प्यात आपल्या स्कॅन केलेल्या प्रतीसाठी (फोटोकॉपी) यशस्वीरीत्या अर्ज केला होता. 2. बोर्ड प्रत्यक्ष काय तपासणार? यामध्ये दोन मुख्य गोष्टी असतील : पहिले, गुणांच्या बेरजेची फेरतपासणी आणि दुसरे, एखाद्या प्रश्नाच्या मूल्यमापनात सुटलेले गुण किंवा विसंगतींचे प्रत्यक्ष पुनर्मूल्यांकन. 3. ही प्रक्रिया कशी पुढे जाईल? सीबीएसई ही आव्हाने संबंधित विषयाच्या नवीन आणि वरिष्ठ तज्ज्ञांच्या समितीकडे पाठवते. हे तज्ज्ञ त्याच प्रश्नांची फेरतपासणी करतात, ज्यावर विद्यार्थ्याने आक्षेप घेतला. मार्किंग स्कीमच्या अंतर्गत गुण योग्य दिलेत की नाही हे ते पाहतात. 4. जर गुण बदलले तर काय होईल? पुनर्मूल्यांकनानंतर गुणांत बदल झाला तर तो बोर्डाच्या वेबसाइटवर अपडेट केला जातो. तुम्हाला तुमची जुनी मूळ गुणपत्रिका तुमची शाळा किंवा प्रादेशिक कार्यालयात परत करावी लागेल.
नीट : या वेळी हवाई दल १८ ठिकाणी पेपर पोहोचवणार
२१ जून रोजी होणारी नीट यूजी २०२६ री-एक्झाम लीक-प्रूफ बनवण्यासाठी एनटीएने सुरक्षा कडक केली आहे. परीक्षेशी संबंधित कर्मचाऱ्यांना हाय-सिक्युरिटी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. या वेळी मल्टी-लेअर सिक्युरिटी सिस्टिमअंतर्गत हवाई दल १८ निवडक ठिकाणांवर प्रश्नपत्रिका सुरक्षित पोहोचवेल.