Headlines

मोफत वाळू देण्यासाठी जलसमाधी आंदोलन:अवैध उत्खनन तत्काळ बंद करण्याची मागणी‎




घरकुल लाभार्थींना शासनाच्या मोफत वाळू योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या निषेधार्थ तसेच वाढत्या अवैध वाळू उत्खननाविरोधात छावा क्रांतीवीर सेनाच्या वतीने सोमवारी गोदावरी नदीपात्रात सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत जलसमाधी आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी नदीपात्रात उतरून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. घरकुलाच्या गरीब लाभार्थींना हक्काची वाळू द्या, “वाळू माफियांना संरक्षण देणे बंद करा’ “अवैध वाळू उत्खनन तत्काळ बंद करा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी मोफत वाळू योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला. शासनाने घरकुल लाभार्थींसाठी मोफत वाळू योजना जाहीर केली असली, तरी प्रत्यक्षात गरजू नागरिकांना वाळू मिळत नसल्याने अनेकांची घरे रखडल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनात अनिल राऊत, साईनाथ कर्डिले, शिवाजी साबळे, रामेश्वर बावणे, भगवान सोरमारे, कृष्णा काळे, गणेश औटे, गणेश पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *