![]()
कन्नड तालुक्यातील भोकनगाव येथे दीड वर्षापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहिता मयूरी सचिन खरे (२२) यांनी आपल्या राहत्या घरात सोमवार, ८ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास छताच्या लोखंडी हूकला गळफास लावून आत्महत्या केली. या संदर्भात कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत फिर्याद नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होतो. मृत मयूरी सचिन खरे यांचा भाऊ ऋषिकेश संतोष आढाव यांनी माहिती दिली की, त्यांची बहीण मयूरी हिचा विवाह ७ नोव्हेंबर २०२५ ला सचिन नंदू खरे यांच्यासोबत लावून देण्यात आला. लग्न झाल्यापासूनच पती सचिन खरे ,सासरे नंदू खरे व सासरचे लोक तिला लग्न छोटे केले, लग्नात हुंडा दिला नाही यावरून मानसिक व शारीरिक त्रास देत होते. तसेच त्यांना मुलगा अपेक्षित होता, मात्र सहा महिन्यांपूर्वी तिला मुलगी झाली याचाही राग पती व सासऱ्याला होता. त्यामुळे तिच्या त्रासात अधिकच भर पडली. नातेवाईक व आमच्याशी जास्त संवाद साधायचा नाही असे निर्बंध घालण्यात आले. धोंड्याच्या महिन्यामध्ये आम्हाला सोन्याची अंगठी व दागदागिने करून दे, अशी मागणी करून तिचा शारीरिक मानसिक छळ केला.
Source link
जाचाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या:भोकनगाव येथे घरात कोणी नसताना घेतला गळफास