![]()
मेळघाटातील पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, रोजगार, वनहक्क आणि रस्त्यांच्या बिकट प्रश्नांसाठी दोन महिन्यांपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी मेळघाट संघर्ष पदयात्रा काढली होती.मात्र, या पदयात्रेनंतरही मेळघाटातील अनेक मूलभूत प्रश्न अद्याप जसेच्या तसे कायम असल्याचा आरोप करत आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि प्रहारजनशक्ती पक्ष यांच्या संयुक्त जनसंपर्क अभियानांतर्गत शनिवारी त्यांनी धारणी वचिखलदरा तालुक्यातील विविध गावांचादौरा करून नागरिकांशी थेट संवादसाधला. दरम्यान, मेळघाटातील समस्यातातडीने निकाली न निघाल्यास आगामीदिवाळीत तीव्र आंदोलन छेडण्याचा कडक इशारा आमदार कडू यांनी यावेळीदिला.मुख्यमंत्री समृध्द पंचायत राजअभियानात राज्यात प्रथम क्रमांकपटकावणाऱ्या धारणी तालुक्यातीलमोगर्दा आणि चिखलदरा तालुक्यातीलगडगाभांडूम या गावांना भेट देऊनआमदार बच्चू कडू यांनी सर्वप्रथमग्रामस्थांचे विशेष अभिनंदन केले. याप्रसंगी ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागतकरत पाणीपुरवठा, वीज, आरोग्य सेवा,शिक्षण, दळणवळणासाठी रस्ते आणिरोजगाराशी संबंधित भेडसावणाऱ्याअनेक गंभीर समस्या त्यांच्या निदर्शनासआणून दिल्या. काही महिन्यांपूर्वीकाढलेल्या मेळघाट संघर्ष यात्रेदरम्यानसमोर आलेल्या प्रश्नांची सद्यस्थितीकाय आहे, प्रशासनाने त्यापैकी कोणतीकामे प्रत्यक्ष पूर्ण केली, कोणते प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत आणिनागरिकांच्या इतर कोणत्या नव्या अडचणी आहेत, याची सविस्तर माहितीबच्चू कडू गावकऱ्यांशी चर्चा करून घेतआहेत. गडगाभांडूम येथे आयोजित जाहीर कार्यक्रमात बोलताना बच्चू कडूयांनी प्रशासकीय यंत्रणेवर जोरदार टीकास्त्र सोडले. “मेळघाट संघर्षयात्रेनंतर आम्ही प्रशासनाला कामेकरण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता. मात्र, प्रशासनाची अनेक कामे आजहीकेवळ कागदावरच मर्यादित आहेत.अधिकारी फक्त बैठकांचे सत्र घेतात,अहवाल पाठवतात; परंतुसर्वसामान्यांच्या आयुष्यात सकारात्मकबदल घडविण्याची त्यांची इच्छाशक्तीअ जिबात दिसत नाही. मेळघाटातीलविकास रखडण्यास पूर्णपणे प्रशासनाचीनिष्क्रियताच कारणीभूत आहे,” असाथेट आरोप त्यांनी केला.या वेळी त्यांनीमेळघाटातील प्रलंबित वीज प्रश्नावरहीतीव्र संताप व्यक्त केला. “देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटलीआहेत, देश प्रगतीच्या आणितंत्रज्ञानाच्या नव्या उंचीवर पोहोचलाआहे; मात्र अत्यंत खेदाची बाब म्हणजेमेळघाटातील काही गावे आजहीअंधारात चाचपडत आहेत. अनेक वस्त्यांपर्यंत नियमित वीज पोहोचलेलीनाही. हा विकासाचा प्रश्न नसूनप्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा,अपयशाचा पुरावा आहे,” असे बच्चू कडू म्हणाले. …तर अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालणार
संघर्ष यात्रेदरम्यान प्रशासनाला दिलेल्या सूचनांची आणि मागण्यांची तातडीने अंमलबजावणी झाली नाही, तर दिवाळीच्या ऐन सणात हजारो आदिवासी बांधवांना सोबत घेऊन अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून घेराव घालण्यात येईल. तसेच मेळघाटातील वीज प्रश्नावर स्वतंत्र आणि व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. प्रशासनाने मेळघाटच्या जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. आता आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर कामे दिसली पाहिजेत, अन्यथा जनतेच्या न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरून हा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल,’ असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी प्रशासनाला दिला आहे.
Source link
मेळघाटच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक:पुन्हा मोठे आंदोलन करण्याचा दिला इशारा, वीज प्रश्नावरही केला संताप व्यक्त