Headlines

आषाढी एकादशीनिमित्त पर्यावरण संवर्धानाचा संकल्प:रोपरुपी प्रसाद वाटप; 490 राेपं, कापडी पिशव्यांचे वितरण‎



पर्यावरण संवर्धन आणि वारकरी परंपरेचा सुरेख संगम साधत, “माय वसुधा विकास’ संस्थेच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त ४९० रोपं आणि कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले.दरम्यान, “माय वसुधा विकास’ संस्थेतर्फे शनिवारी “प्लास्टिक मुक्त अकोला-महाराष्ट्र अभियान’ अंतर्

.

नागरिकांमध्ये जनजागृती प्लॅस्टिक डिस्पोजेबलचा वापर टाळावा म्हणून निःशुल्क ताट, ग्लास, चमचे, वाट्या, चहाचे पेले, नाष्टा प्लेट, मठ्ठा-पन्यासाठी पेले साहित्याच्या निःशुल्क उपलब्धतेचा प्रचार व माहिती देण्याचे कार्य प्रकल्प प्रमुख दिनेश बडगुजर यांनी केले. केवळ रोपे वाटणे एवढाच उद्देश नसून, झाडांचे योग्य प्रकारे संगोपन कसे करावे, याबद्दल जयप्रकाश पाटील, डॉ. महेश डाबरे यांनी मार्गदर्शन केले.

विविध प्रकारच्या ४९० रोपांचे वाटप विठ्ठल भक्तांना विविध प्रकारच्या ४९० रोपांचे वाटप करण्यात आले. यात आंबा, रामफळ, सीताफळ, बेल, शेवगा, उंबर, पिंपळ, वड, कडूलिंब, जांभूळ, चिंच, रिठा, अर्जुन, सीताअशोक, आपटा, सदाहरित टेंभुर्णी, तसेच फुलझाडे, शोभिवंत रोपांचा समावेश होता. प्लॅस्टिक कॅरीबॅग दिसेल त्यांना मोफत कापडी पिशव्यांचे वाटप सुद्धा करण्यात आले. कापडी पिशवी वापराबद्दल डॉ. मनिषा पालीवाल, सोनल वक्ते यांनी प्रबोधन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *