![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असा कार्यकाळ पूर्ण करणार आहे की यापुढे त्यांचा कार्यकाळ कोणीच पूर्ण करू शकणार नाही. नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहणारे नेते ठरणार आहे, असे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यातील पाणंदरस्ते आणि शेतकऱ्यांचे नाले हे पूर्ववत करणे हे महसुल विभागाचे काम आहे. त्यांचे रुंदीकरण झाले तर पुरहानी होणार नाही. राज्यभरात महसुलचे नाल्यांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. हे नाले पूर्ववत करणे ही आमची भूमिका आहे, त्यासाठी स्पेशल टास्क कार्यक्रम राबवणार आहोत. नवनीत राणा हिंदुत्ववादी नेत्या! चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नवनीत राणा या अत्यंत कष्टाळू आणि हिंदुत्ववादी नेत्या आहेत. त्यांना महाराष्ट्रासह देशभरात मान्यता आहे. त्यामुळे नेते म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका ही अत्यंत चांगली आहे. राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागणार होता, ती अट मला मान्य नव्हती, या नवनीत राणा यांच्या वक्तव्यावर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचेच लोकं गुडधेंचे शेटर बंद करतील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रफुल्ल गुडधे यांचे भाजपचे शेटर बंद करू हे वक्तव्य फारच बालीशपणाचे आहे. भाजपचे महाराष्ट्रात 1 कोटी 51 लाख सदस्य आहेत तर जगातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपची ओळख आहे. ते नवे नवे नागपूर काँग्रेस अध्यक्ष झाले आहे ते अतिउत्साही आहेत. त्यांना माहिती आहे की काँग्रेस पक्षात इतकी गटबाजी आहे की त्यांचेच लोकं प्रफुल्ल गुडधे यांचे शेटर बंद करतील. उज्वला गॅससारखे निर्णय तात्पुरते असतात चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उज्वला गॅसचा जो निर्णय घेण्यात आला आहे तसे निर्णय काही काळासाठी घ्यावे लागतात. जसे कोरोनाच्या काळात काही सवलती कमी करण्यात आल्या नंतर त्या वाढवण्यात आल्या नंतर सर्व काही स्टेंबल होते. तर नागपूर जिल्ह्यातील भाजप नगरसेवक हे मुंबईमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी स्वखर्चाने चालले आहेत. त्यांनी पक्षाकडून एकही रुपया घेतलेला नाही.
Source link
मोदींचा कार्यकाळ ऐतिहासिक; भविष्यात कोणीच त्यांची बरोबरी करू शकणार नाही!:प्रफुल्ल गुडधेंचे वक्तव्य बालिश- चंद्रशेखर बावनकुळे