![]()
नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा सततचा तगादा या दुष्टचक्रामुळे मृत्यूला कवटाळणाऱ्या राज्यातील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतील शेतकरी कुटुंबांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. शेतकरी आत्महत्याप्रकरणी त्यांच्या वारसांना तातडीने आर्थिक मदत देण्
.
या निधी वाटपात शेतकरी आत्महत्येचे सर्वाधिक चटके सहन करणाऱ्या अमरावती विभागाला सर्वाधिक ८ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांनी आपापल्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांच्या मागणीनुसार हा निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा.
देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात
देशातील शेतकरी आत्महत्येपैकी ४० टक्के शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. राज्यात दररोज सरासरी १७ आत्महत्या हेात आहेत. गेल्या सात दिवसांत ११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर पाच महिन्यांत ३१२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यामागे शेतीतील वाढता खर्च, पिकाचा अनिश्चित व कमी भाव, कर्ज व लहरी हवामान ही कारणे आहेत.
कोणाला किती निधी?
अमरावती ८.७६ कोटी संभाजीनगर५.९२ कोटी नागपूर५. ७५ कोटी नाशिक३.३९ कोटी पुणे१.०६ कोटी कोकण१२.०० लाख