![]()
व्यावहारिक जगात शब्द देणे म्हणजे वचनच मानले जाते. राजकारणात सर्वपक्षीय नेतेमंडळी असे शब्द देतात. त्यातील काही शब्द म्हणजे वचने पाळतात आणि काही मोडीत काढतात. त्यातून गुंता निर्माण होतो. त्याचाच अनुभव सध्या विधान परिषद, राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीमध्ये येत आहे. त्याची तीन उदाहरणे समोर आली आहेत. पहिले उदाहरण विधान परिषदेच्या उमेदवारीचे आहे. तेथे भाजपच्या नेत्यांनी गोकुळ गिते यांना संधी देऊ, असा शब्द दिला होता. प्रत्यक्षात ही जागा शिंदेसेनेला सुटली. त्यामुळे गितेंनी बंडखोरी केली. मंत्री महाजन, उदय सामंत यांनी मनधरणी करूनही गिते माघार घेण्यास तयार नाहीत. दुसरे उदाहरण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळांना राज्यसभेवर जाण्याची संधी हुकण्याचे आहे. भुजबळांनी पुतण्या समीर भुजबळला मंत्रिपद आणि येवल्यातून विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारीची अट टाकली होती. म्हणून त्यांना संधी नाकारण्यात आली, असे समोर आले. मात्र, भाजपने आगामी मंत्रिमंडळ विस्तारात संधीचा शब्द दिला, असे समीर यांनीच जाहीर केले. राष्ट्रवादीचे मंत्रिपद भाजपने ठरवण्यावरून धुसफूस सुरू होण्याची चिन्हे आहेत. तिसरे उदाहरण राज्यसभेच्याच उमेदवारीचे आहे. भुजबळांच्याऐवजी राष्ट्रवादीने माजी खासदार नवनीत राणा यांना संधी देण्याचे ठरवले होते. मात्र, उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत घरवापसी करावी, असा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांचा आग्रह होता. तो राणा यांनी मान्य केला नाही. शिंदेसेनेचे उमेदवार दराडे फडणवीसांना भेटले दरम्यान, नाशिकमधील भाजपचे बंडखोर उमेदवार गिते आता मंत्री महाजन, सामंत यांना जुमानत नसल्याचे पाहून महायुती-शिंदेसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी मुंबईत धाव घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. गितेंच्या माघारीसाठी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट सूत्रे हाती घेतल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आज वर्धापन दिन राष्ट्रवादी शरद पवार गटाचा २७ वा वर्धापन दिन सोहळा मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सकाळी १० वाजता होईल. त्यात शरद पवार मार्गदर्शन करतील. इंडिया आघाडीची बैठक, १० जूनची एनडीएची बैठक, महागाई आदी सध्या चर्चेत आहेत. त्यावर तसेच महायुतीवर पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 1 नवनीत राणा यांचा घरवापसीला नकार
२०१९ मध्ये अमरावतीत राष्ट्रवादीच्या खासदार राणांनी आता मी भाजपची निष्ठावान कार्यकर्ता आहे, असे म्हणत राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेशास नकार दिला.
परिणाम : अमरावतीत भाजपचा एक गट राणांच्या विरोधात आहे. त्यांच्या भाजपमध्येच राहण्याने गटबाजी उफाळेल तसेच राणांच्या राजकीय पुनर्वसनासाठी भाजप नेतृत्वाला तातडीने प्रयत्न करावे लागतील. 2 समीर भुजबळांचा मंत्रिपदावर दावा आता मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मी अजिबात नाराज नाही. कारण आगामी मंत्रिमंडळाच्या विस्तारात मला भाजप संधी देणार, असे समीर यांनी जाहीर केले.
परिणाम : राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कोट्यातील मंत्रिपदासाठी भाजप कसा काय शब्द देऊ शकतो, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांत त्यावरून खासगीत नाराजी व्यक्त होत आहे. 3 गितेंच्या शक्तीमागे कोणती शक्ती? गेल्या आठ दिवसांपासून मंत्री महाजन, सामंत यांनी प्रयत्न करूनही गोकुळ गितेंनी माघार घेतली नाही. शेवटी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला. परिणाम : नाशिकमध्ये शिंदेसेना विरुद्ध भाजप अशी तेढ लोकसभेच्या निवडणुकीपासून आहे. ती आता आणखी वाढीस लागली आहे. गितेंच्या मागे कोणती शक्ती, असा सवाल निर्माण होत आहे. राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रिपद हवे : झिरवाळ, नायकवाडी रडारवर दिल्लीत १० जून रोजी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी मंगळवारी प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि नवनियुक्त राज्यसभा उमेदवार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात राष्ट्रवादीला केंद्रात एक कॅबिनेट मंत्रिपद मिळवण्यासाठी रणनीती ठरली. विविध प्रकरणात वादग्रस्त मंत्री नरहरी झिरवाळांचे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद जाण्याची तसेच आमदार इद्रिस नायकवाडींच्या जागी नव्या चेहऱ्याला संधीची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
Source link
राजकारण:वचनावरून महायुतीत गुंता, नाशिक विधान परिषदेत भाजप बंडखोर गितेंच्या माघारीसाठी मुख्यमंत्री हस्तक्षेप करणार