Headlines

20 बंडखोर खासदारांच्या चीफ व्हिप काकोली घोष पदावर अडल्याने पेच:बंडखोरीनंतर ममतांकडून कल्याण बॅनर्जींची लोकसभेत मुख्य प्रताेद म्हणून नियुक्ती


  • Marathi News
  • National
  • After The Rebellion, Mamata Appoints Kalyan Banerjee As The Chief Whip In The Lok Sabha, Embarrassment As Kakoli Ghosh, The Chief Whip Of 20 Rebel MPs, Remains In The Post.

कोलकाता1 तासापूर्वी

  • कॉपी लिंक

तृणमूलमधील फुटीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी खासदार कल्याण बॅनर्जी यांची लोकसभेत पक्षाचे मुख्य प्रतोद (चीफ व्हिप) म्हणून नियुक्ती केली. ही निवड तत्काळ प्रभावाने लागू करण्यात यावी, असे ममतांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. तृणमूलच्या लोकसभेतील २८ पैकी २० खासदारांनी सोमवारी ममतांची साथ सोडत एनडीए सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ममतांनी पक्षाचा मुख्य प्रतोद म्हणून कल्याण बॅनर्जींची नियुक्ती केली आहे.

चीफ व्हिप हा कोणत्याही राजकीय पक्षाचा ज्येष्ठ नेता असतो, जो संसद किंवा विधानसभेत पक्षाच्या खासदारांमध्ये आणि आमदारांमध्ये शिस्त राखण्याची आणि पक्षाची रणनीती लागू करण्याची जबाबदारी सांभाळतो. जर कोणी आदेश मानले नाहीत तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाते. सोमवारच्या बंडखोरीपूर्वी लोकसभेत तृणमूलचे २८ व राज्यसभेत १३ खासदार होते. ३ जून रोजी ५८ आमदारांनीही स्वतंत्र गट स्थापन केला आहे.

मीच मुख्य प्रतोद राहीन : खासदार काकोली घोष

काकोली यांनी सोमवारी सांगितले होते की त्या अद्यापही लोकसभेत पक्षाच्या मुख्य प्रतोद (चीफ व्हिप) आहेत. काकोली यांनी २७ मे रोजी तृणमूल सोडली, परंतु खासदारकीचा राजीनामा दिलेला नव्हता. मीच चीफ व्हीप राहणार असे काकोली यांनी म्हटले आहे. आपण १९८६ पासून ममतांसोबत आहे. संघर्ष करत करत येथे आले आहे. माझे शीर धडावेगळे होईल पण झुकणार नाही. मी खूप सहन केले आहे, असेही त्यांनी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *