![]()
नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होत आहे. त्यामुळे नामवंत कंपन्यांच्या तसेच लोकल निर्मिती असलेल्या विविध कलरच्या सॅक, दप्तरे, वह्या, पाणी बॉटल, टिफीन बॉक्स आदी शैक्षणिक साहित्यांनी बाजारपेठ गजबजली आहे. यंदा वेगवेगळे शैक्षणिक साहित्य १० ते २५ टक्के
.
गेल्यावर्षी ४४० रुपये डझन असणाऱ्या वह्या आता ४८० रुपयांवर गेल्या आहेत. दोनशे रुपयांचे दप्तर ३०० रुपयांना झाले आहे. वह्यांच्या किमती डझनमागे ३० ते ४० रुपयांनी वाढल्या आहेत.नामांकित कंपन्यांच्या वह्यांच्या दरात २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. दरम्यान सन २०२५ मध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक साहित्य एक हजार रुपयापर्यंत मिळत होते. याच साहित्यासाठी आता दीड हजार ते २ हजार रुपये मोजावे लागत आहेत.
खासगी, विनाअनुदानित शाळांतील पालकांना बाजारातून महागडे पुस्तक संच घ्यावे लागतात, एका मुलाच्या शैक्षणिक साहित्याचा खर्च ४ हजारांच्या घरात पोहोचल्याने पालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
साहित्याचे दर : वॉटर बॅग : ७० ते ४०० रुपये कंपास पेटी : ७५ ते ३०० रुपये टिफिन बॉक्स : ५० ते ६५० रुपये,रेनकोट : २०० ते ७०० रुपये,स्कूल बॅग (सॅक) : ३०० ते १२०० रुपये,वह्या : २०० ते ४८० रुपये डझन
इ. २री चा खर्च ४ हजार ^यावर्षी मुलगा इयत्ता दुसरीमध्ये गेला असून त्याचा एका खासगी शाळेत प्रवेश आहे. त्याची शैक्षणिक खरेदी केली दर वधारल्याने ती चार हजारांच्या घरात गेली आहे. – सचिन व्यवहारे, पालक