Headlines

ठाण्यात संतापजनक प्रकार!:किरकोळ वादातून परप्रांतीयाची वृद्धाला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल होताच आरोपी ताब्यात




ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर किरकोळ वादातून एका वृद्ध नागरिकाला ओला चालकाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाण करणारा व्यक्ती परप्रांतीय असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपीला अखेर ताब्यात घेण्यात आले आहे. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर सोमवारी सायंकाळी एका किरकोळ कारणावरून वृद्ध व्यक्ती आणि ओला चालक यांच्यात वाद झाला. मात्र हा वाद काही क्षणांतच विकोपाला गेला आणि संतापलेल्या चालकाने वयोवृद्ध व्यक्तीला शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे मारहाणीत वृद्ध व्यक्ती खाली कोसळून जखमी झाले, तर त्यांच्यासोबत असलेल्या वृद्ध महिलेनं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने कोणाचेही ऐकून न घेता मारहाण सुरुच ठेवली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच विविध स्तरातून आरोपीवर कारवाईची मागणी सुरू झाली. दरम्यान, व्हायरल व्हिडिओची दखल घेत शिवसेनेच्या दोन्ही गटांतील पदाधिकाऱ्यांनी आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर संबंधित चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. वृद्ध नागरिकावर झालेल्या हल्ल्यामुळे ठाण्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नवले पुलावर पुन्हा भीषण अपघात: सिमेंट टँकर दुचाकीवर उलटला; एकाचा मृत्यू तर दोघे जखमी, चालकावर गुन्हा दाखल पुण्यातील नवले पूल परिसरात बुधवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव सिमेंट मिक्सर उलटल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. नऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत पल्स हॉस्पिटलसमोर ही घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरातील अपघातांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *