Headlines

PMWDA Metro to Shivaji Nagar by August, Baner Line by July



पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील बहुप्रतिक्षित पुणे मेट्रो लाईन ३ अंतर्गत माण-हिंजवडी ते बाणेर (रामनगर) या १२ स्थानकांचा पहिला टप्पा १५ जुलैपर्यंत प्रवाशांसाठी खुला केला जाईल, अशी घोषणा ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिज

.

डॉ. चौधरी यांनी ‘पीएमआरडीए’च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पत्रकारांशी संवाद साधताना प्राधिकरणाच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती दिली. पायाभूत सुविधांचा विकास, वाहतूक कोंडीची समस्या आणि प्रशासकीय पारदर्शकता या त्रिसूत्रीवर आगामी काळात विशेष भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. मेट्रो, इनर रिंगरोड, पाणीपुरवठा, मान्सूनपूर्व तयारी आणि अनधिकृत बांधकांवरील कारवाई या मुद्द्यांवरही त्यांनी प्राधिकरणाची भूमिका स्पष्ट केली.

महानगर आयुक्तांनी सांगितले की, माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईन ३ चे काम वेगाने सुरू असून, डिसेंबर २०२६ पर्यंत ही मेट्रो पूर्ण क्षमतेने धावेल. पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांसाठी १५ ते २० जून दरम्यान ‘सीएमआरएस’कडून तांत्रिक पाहणी व सुरक्षा तपासणी केली जाईल. या तपासणीनंतर जूनअखेर किंवा १५ जुलैपर्यंत सेवा निश्चितपणे सुरू होईल. प्रवाशांच्या सुविधेसाठी पहिल्या ७ स्थानकांपर्यंत दर्जेदार फूटपाथ तयार केले जात आहेत.

नागरिकांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत आणि फाईल्सचा प्रवास गतिमान व्हावा, यासाठी ‘पीएमआरडीए’मध्ये ‘सिंगल विंडो इनवर्ड-आउटवर्ड’ सुविधा सुरू करण्यात येत आहे. या तांत्रिक प्रणालीमुळे एखादी फाईल नेमकी कुठे थांबली आहे, हे त्वरित कळेल. प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्यासाठी लवकरच ‘एमपीएससी’मार्फत लिपिक संवर्गातील ७० कर्मचारी मिळणार असून, इतरही अधिकारी प्रतिनियुक्तीवर येत आहेत. यामुळे सर्व विभागीय कार्यालये पूर्ण क्षमतेने चालवली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. चाकणमधील वाहतुकीचा प्रश्न गंभीर असून, येथील कोंडी फोडण्यासाठी रोड प्लॅनिंगमधील रस्त्यांची कामे ‘पीएमआरडीए’ स्वतः पुढाकार घेऊन करणार आहे. तसेच, रिंगरोडच्या भूसंपादनाबाबत वरिष्ठ पातळीवर सविस्तर चर्चा सुरू आहे. सर्व तांत्रिक आणि कायदेशीर मुद्दे स्पष्ट झाल्यानंतरच प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होईल. कोणतीही अर्धवट भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार नाही, असे महानगर आयुक्तांनी स्पष्ट केले.

पुणे शहरातील दोन जोड बोगद्यांचा (ट्विन टनेल) प्रकल्प सध्या ‘पुम्टा’च्या मंजुरीच्या स्तरावर आहे. याचा व्यावहार्यता अहवाल सादर झाला असून, सुचवलेल्या बदलांना मंजुरी मिळाल्यानंतर तो वरिष्ठ स्तरावर पाठवला जाईल. हा प्रकल्प पुणे महापालिका राबवत असून ‘पीएमआरडीए’ त्यात साहाय्य करत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *