Headlines

कॉरिडॉर आरिष्ट निवारणार्थ विष्णुयाग:पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून 7 दिवसीय यज्ञाचे आयोजन; 15 जून रोजी मिरवणूक‎




श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रस्तावित कॉरिडोर रुपी अरिष्ट (संकट) निवारणार्थ आणि श्री पुरुषोत्तम मासाचे (अधिक मास) औचित्य साधून विशेष सात दिवसीय विष्णूयागाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्तदिनात्मक विष्णूयागाच्या (यज्ञ) आज दुसऱ्या दिवसाच्या प्रथम सत्राला उत्साहात सुरुवात झाली आहे. दिलेल्या माहितीनुसार, हा विष्णूयाग दि. ९ ते १५ जून या कालावधीत दररोज सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत हिंदू महासभा भवन, महाद्वार, पंढरपूर येथे संपन्न होत आहे. श्री तीर्थक्षेत्र बचाव समिती पंढरपूर, श्रीमद् काण्व वेद पाठशाळा पंढरपूर आणि अखिल भारत हिंदू महासभा पंढरपूर यांच्या वतीने या धार्मिक अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले आहे. यज्ञाच्या दुसऱ्या दिवशीही विधीवत पूजनेने प्रथम सत्राची सुरुवात झाली असून, पंढरपूर येथील आणि बाहेरून आलेल्या सर्व भाविकांनी या विष्णूयागाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच आज सकाळी पावणेअकरा (१०.४५) वाजता होणाऱ्या मुख्य आरतीसाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, असेही विनीत आयोजकांनी कळवले आहे. दि. १५ सोमवार अमावस्या या दिवशी, यज्ञ सांगतेची अवभृत स्नानाची जंगी मिरवणूक निघणार आहे. या सर्व कार्यक्रमांना जनतेने साथ द्यावी असे आवाहन तीर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगांवकर, उपाध्यक्ष माउली महाराज गुरव सर्व बाधित मंडळींनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *