Headlines

अकलूजमध्ये सामुदायिक सोहळ्यात गुंफल्या 14 जोडप्यांच्या रेशीमगाठी:बागवान सहारा फाउंडेशनतर्फे प्रत्येक जोडप्याला 25 हजारांचे संसारोपयोगी साहित्य‎




अकलूज येथे बागवान सहारा फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात १४ जणांचे विवाह लावण्यात आले. विवाहित जोडप्यांना प्रत्येकी २५ हजारांचे संसारपयोगी साहित्य देण्यात आले. या फाउंडेशनचे अशा सामाजिक उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला. सोलापूर येथील हाजी उमरभाई बागवान यांनी स्थापन केलेल्या शाहीन फाउंडेशनचा आदर्श घेऊन येथील बागवान समाजाच्या तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या “बागवान सहारा फाउंडेशन”च्या वतीने आयोजित करण्यात आलेला दुसरा सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. आनंदनगर येथील आनंदी गणेश मंदिराच्या भव्य हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. यावर्षी एकूण १४ वधू-वरांनी हजारो लोकांच्या साक्षीने आपल्या नवीन संसाराची सुरुवात केली. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गजांसह मुंबई व शेजारील कर्नाटक राज्यातून पाहुण्यांनी हजेरी लावली. यामध्ये माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, ज्येष्ठ नेते किशोरसिंह माने-पाटील, शाहीन बागवान, सोलापूर येथील शाहीन फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून अशा विवाह सोहळ्यांचे यशस्वी आयोजन करत आले आहे. ‘निकाह को आसान करो’ हे त्यांचे ब्रीद वाक्य अकलूजच्या या बागवान सहारा फाउंडेशनने उचलून धरले आहे. शाहीन फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी उमरभाई बागवान, शिवरत्न शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष शितलदेवी मोहिते-पाटील, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील, जीवन जानकर, नगराध्यक्ष रेश्मा अडगळे आदी उपस्थित होते. वधू-वरांच्या कागदपत्रांची विवाह रजिस्टर नोंदींची महत्त्वाची जबाबदारी हाजी शुकुर रसूल बागवान आणि गौस शब्बीर बागवान यांनी चोखपणे पार पाडली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी बागवान सहारा फाउंडेशनचे अध्यक्ष – तोहीद (मुन्ना) चौधरी, उपाध्यक्ष-हाजी नाजीर हुसेन मोहोळकर, सचिव-तनवीर तांबोळी, जावेद बागवान, खजिनदार-नाझीम खान, दिलदार मोहोळकर, अलीम बागवान, अखिल बागवान, रफिक तांबोळी, जुबेर बागवान, साहिल बागवान यांच्यासह सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. “निकाह को आसान करो’चा संदेश



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *