Headlines

पहिल्या टप्प्यात मध्य राजापेठ, पूर्व झोन दस्तूरनगर अव्वल:मुदतीपूर्वीच 100 टक्के घर यादी व गट यादीचे काम पूर्ण, अधिकारी-कर्मचाऱ्यांचा केला गौरव‎




महानगरपालिकेच्या वतीने जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीला वेग आला असून पहिल्या टप्प्यातील घर यादी (एचएलबी) आणि गट यादी तयार करण्याच्या कामात मध्य झोन कार्यालय क्र. २, राजापेठ आणि पूर्व झोन कार्यालय, दस्तूरनगर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दोन्ही कार्यालयांनी शासनाने निर्धारित केलेल्या मुदतीपूर्वीच आपल्या कार्यक्षेत्रातील १०० टक्के काम पूर्ण करून शहरातील इतर चार्ज कार्यालयांसमोर आदर्श निर्माण केला आहे. या उत्कृष्ट कार्याची दखल घेत प्रधान जनगणना अधिकारी तथा मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला. जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात घर यादी व गट यादी तयार करण्याचे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात आले आहे. या टप्प्यात शहरातील प्रत्येक घर, इमारत, व्यावसायिक आस्थापना तसेच इतर वास्तूंची नोंदणी करून त्यांचे डिजिटल दस्तावेजीकरण करण्यात येत आहे. हे काम १६ मे ते १४ जून या कालावधीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जनगणना संचालनालयाच्या निर्देशानुसार १० जूनपर्यंत सर्व एचएलबीचे काम १०० टक्के पूर्ण होणे अपेक्षित असताना मध्य झोन कार्यालय, राजापेठ आणि पूर्व झोन कार्यालय, दस्तूरनगर यांनी ७ जून २०२६ रोजीच आपले संपूर्ण काम पूर्ण केले. त्यामुळे ही दोन्ही कार्यालये जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील कार्य यशस्वीपणे पूर्ण करणारी शहरातील पहिली चार्ज कार्यालये ठरली आहेत. मध्य झोन कार्यालय क्र. २, राजापेठ येथे चार्ज अधिकारी भूषण पुसतकर यांच्या नेतृत्वाखालील चमूने नियोजनबद्ध पद्धतीने काम करत अल्पावधीत सर्वेक्षण पूर्ण केले. या चमूमध्ये उपअभियंता दिनेश हंबर्डे, सहाय्यक चार्ज अधिकारी लक्ष्मण पावडे, जनगणना लिपिक विष्णू लांडे आणि तांत्रिक सहाय्यक हिमानी पुसदेकर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. पूर्व झोन कार्यालय, जनगणना हा भविष्यातील विकास आराखड्याचा पाया सत्कार समारंभात बोलताना आयुक्त लड्डा यांनी जनगणना हे केवळ सांख्यिकीय कार्य नसून भविष्यातील विकास आराखड्याचा पाया असल्याचे सांगितले. शहरातील लोकसंख्या, निवास व्यवस्था, नागरी सुविधा, पायाभूत विकास, शासकीय योजना आणि विविध धोरणांच्या अंमलबजावणीसाठी जनगणनेतील अचूक माहिती अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने जबाबदारीने आणि समर्पित भावनेने हे कार्य पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *