Headlines

दिल्ली लाठीचार्ज निषेधार्थ दर्यापुरात विरोधकांचा रास्ता रोको:भाजप सरकारविरोधात सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी, विद्यार्थ्यांचा सहभाग




दर्यापूर येथे केंद्रातील भाजप सरकारविरोधात सर्वपक्षीय पदाधिकारी, संयुक्त किसान मोर्चा आणि भारतीय विद्यार्थी मोर्चाने रास्ता रोको आंदोलन केले. दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत शेतकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने आपला निषेध नोंदवत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला. आंदोलकांनी देशातील लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न थांबवावा, अशी मागणी केली. तसेच, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलनात डॉ. अभय गावंडे, नितेश वानखडे, प्रा. गजानन कोरे, अंकुश पाटील कावडकर, मनोज तायडे, असलम मंसूरी, गुणवंत गावंडे, गुड्डू पटेल, नितीन गावंडे, दादा इंगळे, बबनराव विल्हेकर, हाजी अश्रफ घानीवाले, मोहन बुंदिले, शशांक धर्माळे, सागर गिरे, दिनकर देशमुख (वडनेर गंगाई), प्रदीप वडतकर, अतिश शिरभाते, मधुकर घाडगे, पंकज राणे, अनिकेत वाकपांजर, प्रा. डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे, आरिफ भाई, वैभव बागडे, बबलू कुरेशी, राज इंगळे, अरुणा गावंडे, गोकुळ गावंडे आणि जयश्री चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *