Headlines

गायगाव देवस्थान “गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दुमदुमले:गायगावच्या प्राचीन श्री गणपती मंदिरात पहाटेपासून भक्तांच्या लांब रांगा‎



अधिक मास अर्थात धोंड्याच्या महिन्याचा समारोप जवळ आल्याने जिल्ह्यातील प्रसिद्ध व प्राचीन गायगाव येथील श्री गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे. अधिक मासाचे शेवटचे दिवस असल्याने पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांच्या लांबच लांब रांगा ला

.

हिंदू धर्मात अधिक मासाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या पवित्र काळात पूजा, अर्चना, जप आणि देवदर्शनाला भाविक प्राधान्य देतात. नवसाला पावणारा गणपती म्हणून गायगावच्या या देवस्थानाबाबत भक्तांमध्ये अढळ श्रद्धा आहे. आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी अनेक भक्त येथे नवस बोलतात आणि नवस पूर्ण झाल्यावर कुटुंबासह येऊन बाप्पाचे दर्शन घेतात. धोंड्याच्या महिन्याचे औचित्य साधून विशेषतः माहेरी आलेल्या विवाहित मुली आपल्या पतीसह (जावयांसह) गणपतीच्या दर्शनासाठी आवर्जून येत असल्याने मंदिर परिसरात कौटुंबिक आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर समितीच्या वतीने पिण्याचे पाणी, सावली आणि सुलभ दर्शनासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. “गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे

गायगाव येथील श्री गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे.

धोंड्याच्या महिन्यात जावयाला मान हिंदू संस्कृतीत अधिक मासाला ‘पुरुषोत्तम मास’ किंवा “धोंड्याचा महिना’ म्हटले जाते. या काळात जावयाला विष्णूचे रूप मानून त्याचा विशेष सन्मान केला जातो व अनारशांचे वाण दिले जाते. याच परंपरेचा भाग म्हणून अनेक कुटुंबे जावयाला सोबत घेऊन गायगावच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *