![]()
पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी शिवकालीन गडकोट संवर्धन, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणासाठी ‘आपला मावळा’ संघटनेतर्फे भव्य मोहीम आयोजित करण्यात आली आहे. खासदार नीलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत 21 जून 2026 रोजी होणाऱ्या या ‘तुळापूर मोहिमेची’ घोषणा केली. खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील या उपक्रमात राज्यभरातील अनेक स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. 21 जून रोजी सकाळी 7:00 वाजता तुळापूर येथे मोहिमेला सुरुवात होईल. ‘इतिहासाशी नातं जोडूया, संस्कृतीचं रक्षण करूया’ हा संदेश घेऊन युवक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने श्रमदान करतील. ‘आपला मावळा’ संघटनेने 16 मार्च 2025 पासून राज्यव्यापी संवर्धन मोहीम सुरू केली आहे. गेल्या दीड वर्षात शिवनेरी, सिंहगड, प्रतापगड, राजगड, साल्हेर यांसारख्या महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांवर तसेच तामिळनाडूतील ऐतिहासिक जिंजी किल्ल्यावर स्वच्छता व संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवली आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांना 18 जून रोजी रात्री 11:45 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत स्वयंसेवकांसाठी सकाळी चहा-नाश्ता, दुपारचे जेवण आणि 20 जून रोजी मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. अहिल्यानगर आणि पारनेर येथून 20 जून रोजी सायंकाळी 6:00 वाजता खास बसची सोय उपलब्ध आहे. स्वयंसेवकांनी सोबत चादर किंवा ब्लँकेट आणावे आणि ज्यांच्याकडे ‘आपला मावळा’चे टी-शर्ट आहे, ते परिधान करून यावे. इतरांसाठी अल्पदरात टी-शर्ट उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी https://aaplamavla.com/campaign/tulapur या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपर्क क्रमांक: 9422458462, 9637943333.
Source link
तुळापुरात शिवकालीन गडकोट संवर्धनाचा महायज्ञ:21 जूनला हजारो मावळे इतिहास रक्षणासाठी एकत्र येणार- खासदार निलेश लंके